टोकियो : भारताचा टोकिया ऑलिम्पिकमधील  (Tokyo Olympics 2020) आजचा (7 ऑगस्ट) शेवटचा दिवस आहे. भारताने हा शेवट गोड केला आहे. भालाफेकीत भारताला सुवर्ण पदक मिळालं आहे. भारताचा भालाफेकपटू  नीरज चोप्राने गोल्डन मेडलची कमाई केली आहे. भारताला याआधी अभिनव बिंद्राने 2008 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत वैयक्तिक सुवर्ण मिळवून दिलं होतं. (Tokyo Olympics 2020 Indian javelin thrower Neeraj Chopra wins gold for India after 13 years after Abhinav Bindra)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचणाऱ्या नीरज चोप्राने आपलं गोल्ड मेडल हे मिल्खा सिंह यांना समर्पित केलं आहे. जगप्रसिद्ध धावपटू मिल्खा सिंह यांना हे मेडल समर्पित करण्याचा निर्णय नीरजने घेतला आहे. मिल्खा सिंह आणि पीटी उषा काही सेकंदाच्या फरकाने मेडलपासून दूर राहिले होते. मात्र जगभरात आपल्या नावाचा ठसा उमटवणाऱ्या या जेष्ठ खेळाडूंना नीरजने आपलं मेडल समर्पित केलं आहे. 



ट्रक अँड फिल्ड मध्ये भारताने प्रथमच पटकावलं मेडल आहे. नीरजने 87.58 मीटर भाला फेकला. ऑलिम्पिकमध्ये भारताने प्रथमच सर्वाधिक 7 मेडल्सची कमाई केली आहे. भारताची अॅथलेटिक्समध्ये ऐतिहासिक कामगिरी केली आहे. भारताची टोकियो ऑलिम्पिकची सुरुवात सिल्व्हर मेडलने आणि अखेर गोल्ड मेडलने झाली आहे.


सर्वाधिक 7 मेडल्सची कमाई 


नीरज चोप्रा (Neeraj Chopra) -  भालाफेक - सुवर्ण पदक (Golden Medel)
मीराबाई चानू (Mirabai Chanu) - वेटलिफ्टिंग- रौप्य पदक (Silver Medel)
रवीकुमार दहीया (RaviKumar Dahiya)-कुस्ती-सिल्वर (Silver Medel)
बजरंग पुनिया (Bajarang  Puniya) - कुस्ती- कांस्य (Bronze Medel)
पी व्ही सिंधु (P V Sindhu) बॅडमिंटन- कांस्य  (Bronze Medel)
लव्हलिना बोरगोई (Lovlina Borgohain) - बॉक्सिंग- कांस्य  (Bronze Medel)
भारत पुरुष हॉकी (Indians Mens Hockey Team) - कांस्य  (Bronze Medel)