Tokyo Olympics 2020 : लवलीनाच्या बॉक्सिंगमुळे भारताला कांस्यपदक, विश्वविजेता बॉक्सरकडून पराभूत
बुसानाजे पंच लवलीनाविरुद्ध सरळ निशाण्यावर लागत होते, ज्याचे गुण तिला मिळाले.
मुंबई : टोक्यो ओलंपिकच्या बॉक्सिंग रिंगमध्ये भारताची लवलीना बोरगोहेनला (Lovlina Borgohain) कांस्यपदावरच समाधान मानावे लागले आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात तिचा विश्वविजेता तुर्की बॉक्सर बुसानाजने पराभव केला. ऑलिम्पिकच्या इतिहासात भारतासाठी पदक जिंकणारी लवलीनाही दुसरी महिला बॉक्सर आहे.
त्याच्या आधी विजेंदर सिंगने 2008 च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले होते. त्यानंतर मेरी कॉमने 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले. त्यामुळे तसे पाहाता ती भारतासाठी बॉक्सींगमध्ये मेडल आणणारी 3री खेळाडू आहे. लवलीनासाठी आश्चर्यकारक गोष्ट अशी होती की, ती तिच्या आयुष्यातील पहिला ऑलिम्पिक खेळत असतानाच तिने भारतासाठी कांस्यपदक मिळवलं आहे.
तुर्कीच्या बॉक्सरने सुरुवातीपासूनच सामन्यावर वर्चस्व गाजवल्याचे दिसत होते. लवलीनाने तिचा गार्ड उघडा ठेवला, ज्याचा पूर्ण फायदा वर्ल्ड चॅम्पियन बॉक्सरने उपांत्य फेरीच्या सामन्यात घेतला.
बुसानाजे पंच लवलीनाविरुद्ध सरळ निशाण्यावर लागत होते, ज्याचे गुण तिला मिळाले. अधिक अनुभवी तुर्की बॉक्सरच्या पंचंना भारतीय बॉक्सरकडे उत्तर नव्हते. तिच्या वजनाच्या गटात अव्वल मानांकित बुसानाजने तिन्ही फेऱ्यात आपला खेळ दाखवून जजेसची मन जिंकली.
वर्ल्ड चॅपियनशिपमध्ये दोन वेळा कांस्यपदक जिंकणाऱ्या लवलीनाला विजेंद्र आणि मेरी कॉमला मागे टाकण्यासाठी पूर्ण संधी होती. परंतु अखेर ती, या दोघांना पाठी सोडू शकली नाही. ज्यामुळे भारताला पुन्हा एकदा ऑलिम्पिक बॉक्सिंग रिंगमध्ये कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. गेल्या शुक्रवारी, लवलीनाने चीनी ताइपे बॉक्सरचा 4-1 असा पराभव करून कांस्यपदक मिळवले होते.
लवलीनाच्या कारकीर्दीतील 10 वा पराभव
23 वर्षीय भारतीय बॉक्सर लवलीनाच्या कारकीर्दीतील हा 10 वा पराभव आहे. त्याचबरोबर तिने आतापर्यंत 14 सामने जिंकले आहेत. तर दुसरीकडे, तुर्कीच्या बुसानजने उपांत्य फेरीत तिचा पराभव केल्यानंतर आपला 26 वा विजय नोंदवला आहे.