मुंबई: टोकियो ऑलिम्पिक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. भारतीय खेळाडूही आज टोकियोसाठी रवाना झाले आहेत. मात्र टोकियो ऑलिम्पिकवर कोरोनाचं गडद सावट आललं आहे. ऑलिम्पिक व्हिलेजमधील एकाला लागण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ऑलिम्पिकच्या आयोजकांनी याबाबत माहिती दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑलिम्पिक व्हिलेजमधील एक जण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याची माहिती टोक्यो ऑलिम्पिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी तोशीरो मुटो यांनी दिली. खेळांच्या आयोजनात सहभागी होण्यासाठी परदेशातून आलेला एक जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. गोपनीयतेचा हवाला देत त्यांनी कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीबद्दल माहिती दिली नाही. 


कोरोना महामारीचं संकट असल्यानं टोकियो ऑलिम्पिक एक वर्ष पुढे ढकलण्यात आलं. ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कठोर नियम करण्यात आले आहेत. त्यांनी क्वारंटाईन होणं बंधनकारक आहे.



दरम्यान टोकियोमध्ये 23 जुलैपासून ऑलिम्पिक स्पर्धेला सुरुवात होईल. तर 8 ऑगस्टला स्पर्धेचा समारोप होईल.