टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिलं पदक
वेटलिफ्टींगमध्ये भारताने सिल्वर मेडलला गवसणी घातली आहे.
मुंबई : टोकियो ऑलिम्पिकला सुरुवात झाली आहे. तर या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने खातं उघडलं आहे. वेटलिफ्टींगमध्ये भारताने सिल्वर मेडलला गवसणी घातली आहे. भारताकडून मीराबाई चानू हिने सिल्वर मेडल पटकावलं आहे. मीराचं हे मेडल भारतासाठी पहिलं मेडल ठरलं आहे.
वेटलिफ्टिंगमध्ये 49 किलो वजन गटात मीराबाईने रौप्य पदक मिळवलं आहे. मीराबाई चानूने शानदार प्रदर्शन करत वेटलिफ्टिंगमध्ये स्नॅच प्रकारात 87 किलो वजन उचललं तर क्लीन अँड जर्कमध्ये तिने 115 किलो वजन उचलत पदकावर शिक्कामोर्तब केलं.