टोकीओ : Olympics स्पर्धेत भारतीय महिला हॉकी टीमने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या उपांत्यपूर्व सामन्यात ऐतिहासिक विजय संपादन केला. या विजयासोबत टीमने उपांत्य सामन्यात धडक दिली आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुरजीतचे चांगले प्रदर्शन
भारतच्यावतीने गुरजीत कौरने एकमेव गोल केला. त्यासमोर ऑस्ट्रेलियाची टीम फिकी पडली. त्यांच्यातर्फे एकही गोल झाला नाही.



भारताचा आक्रमक खेळ
भारतीय महिला हॉकी टीमने सुरूवातीपासूनच ऑस्ट्रेलियाच्या टीमवर दबाव आणला होता. आक्रमक खेळ करून ऑस्ट्रेलियाच्या टीमला सामन्यात वरचढ होण्याची कोणतीही संधी दिली नाही.