टोकियो : Tokyo Olympics women's hockey: कांस्य पदकासाठी भारत विरूद्ध ब्रिटन यांच्यात चांगली चुरस पाहायला मिळाली. ब्रिटनकडून अटीतटीच्या सामन्यात भारतीय महिला टीमचा पराभव झाला. भारताचा ब्रिटनकडून 4-3 ने पराभव झाला. दरम्यान, चौथ्या क्वॉर्टरमध्ये ब्रिटनने गोल केला आणि भारताविरुद्ध 4-3 अशी आघाडी मिळवली. त्यानतंर त्यांनी भारताला गोल करू दिला नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ब्राँझ पदकासाठी भारत विरूद्ध ब्रिटन यांच्यातील सामना चांगला उत्कंठावर्धक चालला. टीम इंडियाने पिछाडीवरून जोरदार मुसंडी मारली. पहिल्या क्वार्टरमध्ये भारताला एकही गोल करता आला नाही. मात्र दुसरा क्वार्टर चांगलाच फलदायी ठरला. गुरूजीत कौर आणि वंदना कटारियाने भारताला भक्कम स्थितीत आणलंय. दुस-या क्वार्टरमध्ये भारताला दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले. ते दोन्ही पेनल्टी कॉर्नर गोलमध्ये परिवर्तीत करण्यात भारताला यश मिळालं. पहिल्या क्वार्टरमध्ये पिछाडीवर असलेल्या भारताने या दोन गोलमुळे २-२ अशी बरोबरी मिळवली. त्यानंतर अवघ्या दीड मिनिटात भारताच्या वंदना कटारियाने धडाकेबाज तिसरा गोल केला. त्यामुळे दुसरं सत्र संपताना भारत पिछाडीवरून भक्कम आघाडीवर पोहोचला होता. मात्र, ब्रिटन आक्रमक खेळ करत ही आघाडी मोडीत काढली.



ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics women's hockey) चांगली कामगिरी करणाऱ्या भारतीय महिला हॉकी संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. तरीही महिलांनी भारतीयांची मने जिंकली आहेत. याआधी भारतीय हॉकी संघाने 1980च्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली होती. तेव्हा महिला संघाने चौथा क्रमांक पटकावला होता. कालच भारताच्या पुरुष हॉकी संघाने 41 वर्षानंतर ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकले होते. पुरुष संघाने जर्मनीचा 5-4 असा पराभव करून कांस्यपदक जिंकले होते.


महिला हॉकीच्या पहिल्या क्वॉर्टरमध्ये ब्रिटनने पहिला गोल करून 1-0 अशी आघाडी घेतली होती. भारतीय हॉकी टीम बॅकफूटवर दिसत होती. या क्वॉर्टरमध्ये भारताने गोल केला नसला तरी भारताची गोलकीपर सविताने 4 गोल वाचवले केले. दुसऱ्या क्वॉर्टरमध्ये ब्रिटनने पुन्हा एकदा गोल करून आघाडी 2-0 अशी केली. भारती संघ अडचणीत दिसत असताना 25व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गुरजीत कौरने भारतातर्फे पहिला गोल केला. त्यानंतर पुढच्याच मिनिटाला गुरजीतने पेनल्टी कॉर्नरवर दुसरा गोल करून बरोबरी केली.