Tokyo Paralympics: भाविना पटेलने रचला इतिहास, सिल्वर मेडलवर कोरलं नाव
टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताला पहिलं पदक मिळालं आहे.
मुंबई : टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताला पहिलं पदक मिळालं आहे. टेबल टेनिसपटू भाविना पटेलने टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेत इतिहास घडवला आहे. फायनलमध्ये भाविनाला पराभव पत्करावा लागला मात्र तिने सिल्वर मेडलला गवसणी घातली आहे. फायलनमध्ये भाविनाता 3-0 असा पराभव झाल्याने गोल्ड मेडलचं तिचं स्वप्न भंगलंय.
भाविना पटेलने टोक्यो पॅरालिम्पिक टेबल टेनिसच्या क्लास 4 स्पर्धेत सिल्वर मेडल पटकावलंय. फायनलमध्ये भाविनाचा सामना जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या चीनच्या झोउ यिंगशी होता. यिंगने जेतेपदाच्या लढतीत भाविनाचा 3-0 असा पराभव केला. मुख्य म्हणजे टेबल टेनिसमध्ये पदक जिंकणारी भाविना पहिली खेळाडू ठरलीये.
दरम्यान भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भाविना पटेल हिचं अभिनंदन केलं आहे. त्यांनी ट्विटरवर लिहिलंय की, "पॅरालिम्पिकच्या टेबल टेनिस स्पर्धेत सिल्वर जिंकल्याबद्दल भाविनाचं अभिनंदन. तुमची चिकाटी आणि यश अनेकांसाठी प्रेरणादायी ठरेल."
भाविना एक वर्षांची असताना तिला पोलिओची समस्या उद्भवली. भाविना पटेल म्हणाते, 'मी स्वतःला अपंग समजत नाही. माझा नेहमी विश्वास होता की मी काहीही करू शकते. आणि मी हे सिद्ध केलं की आपण कोणापेक्षा कमी नाही. पॅरा टेबल टेनिस देखील इतर खेळांमध्ये मागे नाही.