विम्बल्डन : रॉजर फेडरर आणि टॉमस बर्डिच यांच्यातल्या आज संध्याकाळी रंगणाऱ्या विम्बल्डनच्या सेमी फायनलकडे साऱ्या जगाचं लक्ष लागलं आहे. पस्तीशी गाठलेला फेडरर सध्या रोज नवे रेकॉर्ड स्थापन करतोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विम्बल्डन सेमीफायनल खेळणारा फेडरर हा दुसरा सर्वात वयस्कर खेळाडू बनलाय.  या आधी केन रोसवॉलनं 39 व्या वर्षी सेमीफायनलमध्ये खेळणारा सर्वात वयस्कर खेळाडू आहे. 


राफाएल नडाल आण अँडी मरे दोघेही स्पर्धेतून बाहेर गेलेत. नोव्हाक जोकोविचनही दुखापतीमुळे माघार घेतलीय. त्यामुळे फेडरर पुन्हा एकदा विम्बल्डनचा चॅम्पियन होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते आहे. 


जर त्यानं ही चॅम्पियनशिप जिंकली तर त्याच्या ग्रँड स्लँम विजयाचाही नवा रेकॉर्ड होणार आहे.