मुंबई : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाला सराव सामन्यात पराभूत करुन टीम इंडियाने (Team India) टी 20 वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup 2021) सज्ज असल्याचं दाखवून दिलंय. टीम इंडिया पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याने (India vs Pakistan) टी 20 वर्ल्ड कप मोहिमेची सुरुवात करणार आहे. टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान 24 ऑक्टोबरला आमनेसामने भिडणार आहेत. (Top 5 Leading run scorers in India vs Pakistan T20I Cricket)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोन्ही संघातील हा एकूण 9 वा टी 20 सामना आहे. तर टी 20 वर्ल्ड कपमधील 6 वी वेळ आहे. टीम इंडियाने शेवटच्या 8 पैकी 7 सामन्यात पाकिस्तानवर मात केली आहे. तर केवळ एकदाच पाकिस्तानने विजय मिळवला आहे. भारतीय संघाने टी 20 वर्ल्ड कपमध्ये पाचही सामन्यात पाकिस्तानला पराभूत केलंय. यातील एका सामन्याचा निकाल हा बॉलआऊटने लावण्यात आला होता.     


दोन्ही संघातील 8 सामन्यांमध्ये बॅटिंग आणि बॉलिंगने कडवी झुंज पाहायला मिळाली आहे. या निमित्ताने दोन्ही संघांकडून टी 20 मध्ये सर्वाधिक धावा करणारे 5 फलंदाजांबाबत आपण जाणून घेणार आहोत.


विराट कोहली (Virat Kohli)


विराट या टी 20 सामन्यात टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. विराटने आतापर्यंत पाकिस्तान विरुद्ध नेहमीच धमाकेदार खेळी केली आहे. विराटने पाकिस्तान विरुद्धच्या 6 सामन्यांमध्ये 86.66 च्या एव्हरेज आणि 118.69 च्या स्ट्राईक रेटने 254 धावा केल्या आहेत. यामध्ये 2 अर्धशतकांचा समावेश असून 78 ही सर्वोच्च धावसंख्या आहे.


शोएब मलिक (Shoaib Malik)


विराटनंतर सर्वाधिक धावांच्या बाबतीत पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि अनुभवी खेळाडू शोएब मलिक दुसऱ्या क्रमांकावर आहे. शोएबने 8 सामन्यात 27.33 च्या सरासरीने 164 धावा केल्या आहेत. 57 ही त्याची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. 


मोहम्मद हाफीज (Mohammed Hafiz)


तिसऱ्या क्रमांकावर पाकिस्तानचा  मोहम्मद हाफीज आहे. हाफीजने 7 मॅचमध्ये 156 रन्स केल्या आहेत. यात 2 हाफ सेंच्युरीचा समावेश आहे.   


युवराज सिंह (Yuvraj Singh)


युवराज सिंहने  पाकिस्तान विरुद्ध जोरदार फटकेबाजी केली आहे. युवराजने 8 सामन्यात 1 अर्धशतकासह 155 धावा केल्या आहेत. युवराजने पाकिस्तान विरुद्ध 72 धावांची सर्वोच्च खेळी केली आहे. 


गौतम गंभीर (Gautam Gambhir)


गौतम गंभीरने पाकिस्तान विरुद्ध खेळलेल्या 5 टी सामन्यात 139 धावा केल्या आहेत.