मुंबई : आयपीएल 2021 चे उर्वरित 31 सामने 19 सप्टेंबरपासून यूएईमध्ये खेळले जातील. याआधी, या हंगामातील 29 सामने भारतात खेळले गेले होते, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लीग 4 मे रोजी मध्येच रद्द करण्यात आली होती. यात शंका नाही की पुन्हा एकदा क्रिकेट चाहत्यांना क्रिकेटचा पूर्ण डोस मिळणार आहे ज्यात त्यांना सर्वोत्तम फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही पाहायला मिळेल. आयपीएल 2021 च्या उर्वरित 31 सामन्यांमध्ये, कोणता फलंदाज आता शतक झळकावतो, हे पाहण्यासारखे असेल. IPL लीगमध्ये कोणत्या फलंदाजांनी आतापर्यंत सर्वात जलद शतक झळकावण्यात यश मिळवले आहे. हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.


ख्रिस गेलच्या नावावर IPL चे सर्वात वेगवान शतक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएलमधील सर्वात वेगवान शतकाचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. ख्रिस गेलने 2013 मध्ये पुणे वॉरियर्सविरुद्ध आरसीबीकडून खेळताना हा पराक्रम केला होता. या सामन्यात गेलने 66 चेंडूत 175 धावा केल्या होत्या. ज्यामध्ये त्याने 17 सिक्स आणि 13 फोरचा समावेश होता. या खेळीदरम्यान त्याने 30 बॉलमध्ये आपले शतक पूर्ण केले.


IPL लीगमध्ये सर्वात वेगवान शतक झळकावण्याच्या बाबतीत युसुफ पठाण दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याने 2010 मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध 37 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. युसूफ पठाण त्यावेळी राजस्थान रॉयल्स संघाचा भाग होता. त्या सामन्यात राजस्थान संघाला 213 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करावा लागला. नंतर युसूफ शतक झळकावून बाद झाला आणि राजस्थान संघाने 7 विकेटवर 208 धावा केल्या आणि त्यांचा 4 धावांनी पराभव झाला. 


आयपीएलमधील तिसरे सर्वात जलद शतक 2013 मध्ये डेव्हिड मिलरने 38 चेंडूत केले होते.


आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक झळकावणारे टॉप 6 फलंदाज


30 चेंडू - ख्रिस गेल विरुद्ध PWI - 2013


37 चेंडू - युसूफ पठाण विरुद्ध MI- 2010


38 चेंडू - डेव्हिड मिलर विरुद्ध RCB - 2013


42 चेंडू - अॅडम गिलख्रिस्ट विरुद्ध MI - 2008


43 चेंडू - एबी डिव्हिलियर्स विरुद्ध GL - 2016


43 चेंडू - डेव्हिड वॉर्नर विरुद्ध KKR - 2017