IND vs AUS : ज्याची भीती होती तेच झालं, वर्ल्ड कपपूर्वी ऑस्ट्रेलियाला जोर का झटका!
IND vs AUS ODI Series : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन वनडे सामने खेळवले जाणार आहे. त्यातील पहिला सामना 22 सप्टेंबर रोजी मोहालीच्या मैदानावर खेळवला जाईल. त्याआधी ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघासाठी वाईट बातमी समोर आली आहे.
Travis Head Injured Before CWC 2023 : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 3 सामन्याच्या वनडे मालिकेसाठी (IND vs AUS ODI Series) ऑस्ट्रेलिया संघाची रविवारी घोषणा झाली. त्यानंतर आज भारतीय संघाची निवड होणार आहे. रात्री साडेआठ वाजता कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर (Ajit Agarkar) एकत्र पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यावेळी ते टीम इंडियाची (Team India) घोषणा करतील. वर्ल्ड कपमधील टीम ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळेल, अशी शक्यता आहे. तर काही खेळाडूंना संधी देखील मिळू शकते. यामध्ये आर आश्विन, तिलक वर्मा आणि वॉशिंग्टन सुंदर यांचा समावेश आहे. अशातच आता ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसल्याचं पहायला मिळतंय. ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू दुखापतग्रस्त असल्याची माहिती समोर आली आहे.
ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज ट्रेविस हेड (Travis Head) दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे त्याच्या विश्वचषकात खेळण्यावर शंका उपस्थित होत आहे. हेड वर्ल्ड कपच्या मध्यापर्यंत उपस्थित नसेल, अशी शक्यता आहे. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया (SA vs Aus) यांच्याच झालेल्या चौथ्या सामन्यात हेडच्या डाव्या हाताला दुखापत (Travis Head Injured) झाली होती. त्यानंतर त्याला मैदान सोडावं लागलं होतं. अशातच आता तो वर्ल्ड कप सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे.
दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन वनडे सामने खेळवले जाणार आहे. त्यातील पहिला सामना 22 सप्टेंबर रोजी मोहालीच्या मैदानावर खेळवला जाईल. तर 24 सप्टेंबर आणि 27 सप्टेंबर रोजी उर्वरित दोन सामने पहायला मिळतील. हे तिन्ही सामना मायदेशी होणार असल्याने टीम इंडियाचा कस लागणार आहे.
IND VS AUS वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाची टीम:
पॅट कमिन्स (C), सीन एबॉट, एलेक्स कॅरी, नाथन एलिस, कॅमरून ग्रीन, जोश हेजलवुड, जॉश इंग्लिश, स्पेंसर जॉनसन, मार्नश लाबुशेन, मिचल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, तनवीर संघा, मॅथ्यू शॉर्ट, स्टीव स्मिथ, मिचल स्टार्क, मार्कस स्टोइनिस, डेविड वॉर्नर, एडम जम्पा.
World Cup साठी ऑस्ट्रेलियाचा संघ
पॅट कमिन्स (C), अॅलेक्स कॅरी (WK), जोश इंग्लिस (WK), ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, अॅडम झाम्पा, मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड, सीन अॅबॉट, कॅमरून ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस , ऍश्टन आगर.