Neeraj Chopra चा पहिला थ्रो फाऊल झाल्यानंतरही केली कमाल, पाहा विजयाचा तो Video
दबावाने भरलेल्या सामन्यात नीरजचा (Neeraj Chopra) पहिला थ्रो फाऊल होता. मात्र, दुखापतीनंतर
Neeraj Chopra Diamond League Final 2022: ऑलिम्पिक सुवर्णपदक (gold medal) विजेता नीरज चोप्रा पुन्हा इतिहास (History) रचला आहे. गुरूवारी झालेल्या डायमंड लीगमध्ये ट्रॉफी जिंकून त्याने भारतीयांची (Indians) मान अभिमानाने उंचावली आहे. डायमंड लीगमध्ये ट्रॉफी जिंकणारा पहिला भारतीय ठरला.
नीरजचा पहिला थ्रो फाऊल पण...
दबावाने भरलेल्या सामन्यात नीरजचा पहिला थ्रो फाऊल होता. मात्र, दुखापतीनंतर मैदानात परतलेला नीरज दुसऱ्या प्रयत्नातच प्रतिस्पर्ध्यांपेक्षा खूप पुढे गेला. त्याने दुसऱ्या प्रयत्नात 88.44 मीटर अंतरावर भालाफेक (Javelin Throw) केली. नीरजने तिसऱ्या प्रयत्नात 88 मीटर, चौथ्या प्रयत्नात 86.11 मीटर, पाचव्या प्रयत्नात 87 मीटर आणि सहाव्या प्रयत्नात 83.60 मीटर फेक केली. पाहा नीरजचा विजयी भालाफेक...
Neeraj Chopra Diamond League Final Video
दरम्यान, झेक ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता जेकोब व्दलेजने 84.15 मीटर फेक करून आघाडी घेतली. पण त्याने दुसऱ्या प्रयत्नात 88.44 मीटर फेक केली आणि ती त्याला पदक जिंकण्यासाठी पुरेशी ठरली.अंतिम फेरीत नीरजने ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता चेक प्रजासत्ताकच्या याकुब वडलागे आणि जर्मनीच्या ज्युलियन वेबर यांचा पराभव केला. वडलेच 86.94 मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह दुसरा आणि जर्मनीचा ज्युलियन वेबर (83.73) तिसरा आला.