कॅनबेरा : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने चमकदार कामगिरी करत हा सामना ११ धावांनी जिंकला. टी नटराजन, रवींद्र जडेजा आणि युजवेंद्र चहल यांच्यासह अनेक खेळाडूंनी सामन्यात महत्त्वपूर्ण कामगिरी केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सामन्यात टी नटराजन आणि युजवेंद्र चहलने शानदार गोलंदाजी केली आणि प्रत्येकी तीन गडी बाद केले. याशिवाय रवींद्र जडेजाने तुफानी फलंदाजी करत 23 बॉलमध्ये 44 धावांची खेळी केली.


सामन्याच्या 7 व्या ओव्हरपर्यंत ऑस्ट्रेलियन संघाची एकही विकेट गेली नव्हती आणि कर्णधार अ‍ॅरोन फिंच उत्कृष्ट फॉर्ममध्ये  खेळत होता. त्यानंतर 7 व्या ओव्हरमधील चौथ्या बॉलवर युजवेंद्र चहलच्या बॉलवर फिंचने शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. पण हार्दिक पांड्याने वेगाने धावत येत उत्कृष्ठ कॅच घेतला.



हार्दिक पांड्याचा हा कॅच पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. या कॅचमुळे भारताला पहिले यश मिळाले जे फार महत्वाचे होते. या कॅचचे सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे. पांड्याच्या या कॅचबद्दल चाहत्यांना वेडे केले आहे.



भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना कांगारूंना 162 धावांचे लक्ष्य दिले. प्रत्युत्तरादाखल ऑस्ट्रेलियाचा संघ ओव्हरमध्ये 150 धावा करू शकला. टीम इंडियाने विजयासह टी20 मालिकेची सुरुवात केली.