धवन पराभवाचा बदला घेण्यासाठी काढणार हुकमी एक्का, `या` खेळाडूची एँन्ट्री
दक्षिण आफ्रिकेला हरवण्यासाठी धवन वापरणार हे `मास्टरकार्ड`
India vs South Africa 2nd ODI : भारत आणि दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या एकदिवसीय मालिकेमध्ये भारताला पहिल्या सामन्यामध्ये पराभव झाला आहे. त्यामुळे दुसरा सामना (India vs South Africa 2nd) हा 'करो या मरो' असणार आहे. दुसऱ्या सामन्यामध्येही भारताचा पराभव झाला तर भारत मालिका गमावू शकतो. 11 ऑक्टोंबरला होणाऱ्या सीरिज डिसायडर सामन्यामध्ये कर्णधार शिखर (Shikhar Dhawan) धवन हुकमी एक्का असणाऱ्या दीपक चहरला (Deepak Chahar) संघात घेण्याची शक्यता आहे. (trending deepak chahar may included team india playing 11 for ind vs sa 2nd odi match Sport Marathi News)
आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारतीय गोलंदाजी फेल ठरली. या सामन्यात भारतीय गोलंदाजांना चोप पडला होता, त्यामुळे प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने 40 षटकात 249 धावा केल्या होत्या. भारतीय गोलंदाजांची ही खराब कामगिरी पाहता दीपक चहरला दुसऱ्या वनडेसाठी टीम इंडियात प्रवेश मिळू शकतो. पहिल्या सामन्यात दीपक चहरला विश्रांती देण्यात आली होती.
दीपक चहरला T20 विश्वचषकातील राखीव खेळाडूंमध्ये ठेवण्यात आले आहे. जखमी जसप्रीत बुमराहच्या जागी त्याला भारताच्या 15 मध्येही स्थान मिळू शकते. दुखापतीतून सावरल्यानंतर दीपक चहर टीम इंडियात परतला आहे. चहरने जर चमकदार कामगिरी केली तर संघ व्यवस्थापन त्याला टी-20 वर्ल्डकपमध्ये स्थान देण्याची शक्यता आहे.
दरम्यान, दीपक चहरने आतापर्यंत टीम इंडियासाठी 9 वनडे आणि 24 टी-20 सामने खेळले आहेत. T20 मध्ये त्याने 8.17 च्या इकॉनॉमीने 29 विकेट घेतल्या आहेत. आयपीएलमधील कामगिरीच्या जोरावर त्याने भारतीय संघामध्ये स्थान मिळवलं होतं.