Ind vs Ban : भारत आणि बांगलादेशमधील (IND vs BAN) पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा पराभव झाला. (IND vs BAN 1st ODI ) अगदी हातातोंडाशी आलेला विजय बांगलादेशच्या मेहदी हसन 38 धावा (Mehidy Hasan) आणि मुस्तफिजुर रहमान 10 धावा (Mustafizur Rahman) यांनी हिसकावून घेतला. या पराभवाचं खापर हे के. एल. राहुलवर (K. L. Rahul) फोडलं जात आहे. कारण राहुलने भारताला 1 विकेटची गरज असताना मेहदी हसनचा कॅच सोडला. हे जरी खरं असलं तरी भारताच्या बॉलर्सने एक गोष्ट केली नाही त्याचा फटका टीम इंडियाला बसला आहे. (Trending Ind vs Ban K. L. Rahuls catch or otherwise Team India bowlers did not throw a yorker India lost India)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताच्या फलंदाजांनी बांगलादेशच्या शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) 5 विकेट तर इबादत 4 बळी यांच्यासंमोर नांगी टाकली. बांगलादेशला अवघ्या 187 धावांचं आव्हान होतं. बांगलादेश हे आव्हान अगदी सहजपणे पूर्ण करेल अस वाटत होतं. मात्र भारतीय गोलंदाजांनी सामना पूर्णपणे पलटवला होता. बांगलादेश ऑल आऊट होणार असं वाटत होतं मात्र मेहदी हसन आणि मुस्तफिजुर रहमान यांनी नाबाद अर्धशतकी भागीदारी करत विजय खेचावून आणला. 


भारतील बॉलर्सने इतका सामना पलटवला खरा पण शेवटच्या ओव्हर्समध्ये जास्त मेहनत घेतली नाही. कारण 11 नंबरच्या फलंदाजाला बाद करण्यासाठी 'यॉर्कर' हे ब्रह्मास्त्र असतं. मात्र ना दीपक चहर ना शार्दुल ठाकुर हे वापरताना दिसला. दोघेही शॉर्ट बाल टाकत होते, याचं नुकसान असं झालं की रहमानही नंतर मोठ्या आत्मविश्वासाने फलंदाजी करताना दिसला.  



बॉलर्सला दबावात म्हणा किंवा वेगळं काही करण्याच्या प्रयत्नात त्यांनी यॉर्कर वापरला नाही. मात्र कप्तान रोहित शर्माला तर अशा सामन्यांचा चांगला अनुभव आहे. आयपीएलमध्ये कित्येक सामने रोहितने आपल्या नेतृत्त्वात जिंकले आहेत. रोहित चहल किंवा ठाकुरला जाऊन यॉर्कर टाकण्याविषयी सांगू शकत होता. शेवट काय हातात आलेला सामना भारताला गमवावा लागला. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी यॉर्करचा वापर का केला नाही? असा सवाल केला आहे. ट्विटरवरही हॅशटॅग यॉर्कर ट्रेडिंग आहे.