हरिश मालुसरे, झी मीडिया,  Ind vs Ban : भारत आणि बांगलादेशमध्ये (IND vs BAN) शेवटच्या एकदिवसीय सामन्यात ईशान किशनचं वादळी द्विशतक (Ishan kishan Double Hundread) आणि किंग कोहलीच्या शतकाच्या जोरावर भारताने 409 धावा केल्या आहेत. ईशानने अवघ्या 126 चेंडूत 200 धावा काढल्या, यामध्ये 24 चौकार, 10 षटकार मारले. तर दुसरीकडे विराट कोहलीनेही (Virat Kohli) 113 धावा करत शतक पूर्ण केलं. दोघांच्या शतकी खेळी नंतर सोशल मीडियावर माजी खेळाडू सुरेश रैनाचा एक फोटो व्हायरल होत आहे. (trending, IND vs BAN, Virat Kohli celebrating ishan kishan double hundred, ishan kishan double hundred, ishan kishan, ind vs ban trending news, marathi sport news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नक्की काय आहे फोटोमध्ये?


फोटोमध्ये दिसत आहे की, कोहलीने पंरपरा चालू ठेवली आहे. ईशान किशनचं द्विशतक पूर्ण झाल्यावर कोहलीनेही आनंद साजरा केला. ईशानने द्विशतक ठोकलं अन् सेलिब्रेशन विराट कोहलीनेही केलं. याआधी इतिहासात पाहिलं तर भारताचा सुरेश रैना एक असा खेळाडू जो कोणीही विसरणार नाही. कारण रैनाही तशाच एक उत्साही आणि तेसस्वी खेळाडू संघामध्ये होता.


पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात कोहली त्याचं शतक पूर्ण करतो आणि नॉन स्ट्राईकवर असलेला रैना ते सेलिब्रेट करत होता. त्यावेळीही रैनाच्या या खिलाडूवृत्तीचं क्रीडाविश्वात सर्वांनी कौतुत केलं होतं. रैना एक चपळ फिल्डरवर म्हणून ओळखला जातो.


बॉलरने विकेट घेतल्यावर त्या बॉलरपेक्षा सर्वात जास्त आनंदाने रैनाला असायचा. त्याचप्रमाणे कोहलीलाही तुम्ही अशाच अॅग्रेसि्व्ह मोडमध्ये मैदानात पाहिलं असेल. आताही कोहली विकेट मिळल्यावर खऱ्या अर्थाने सेलिब्रेशन करताना दिसतो. तात्पर्य इतकंच की रैनानंतर कोहलीनेही पंरपरा चालू ठेवल्याचं आज दिसून आलं. कोहलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून रैनाचीही सर्वांना आठवण झाली आहे.



दरम्यान, ईशान किशनने हा द्विशक मारत इतिहास रचताना वेस्ट इंडिजचा खेळाडू ख्रिस गेलला देखील मागे टाकलं आहे. गेलने 138 बॉल्समध्ये त्याचं द्विशतक पूर्ण केलं होतं. तर किशनने केवळ 126 बॉल्समध्ये ही कामगिरी केल्याने तो गेलचा रेकॉर्ड मोडला आहे.