तिसऱ्या T20 मधून विराट कोहलीची अचानक एक्झिट, काय आहे कारण?
तिसऱ्या टी-20 सामन्यामध्ये स्टार खेळाडू विराट कोहली खेळताना दिसणार नाही.
IND vs SA Virat Kohli Out : भारत आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यामध्ये स्टार खेळाडू विराट कोहली खेळताना दिसणार नाही. भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका जिंकली आहे. T20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर विराटला विश्रांती देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समजत आहे.
भारताला T20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये खेळायचा आहे. मात्र विराट सोमवारी मुंबई विमानतळावर दिसला. गुवाहाटी येथे झालेल्या सामन्यात विराट कोहलीने 49 धावांची नाबाद खेळी खेळली. 175 च्या स्ट्राइकरेटने खेळताना त्याने सात चौकार आणि एक षटकारही मारला. हेही वाचा - IND vs SA Live Streaming 3rd T20I: India-D कधी-कुठे पाहायचे. आफ्रिकेचा तिसरा सामना
5 ऑक्टोबरला संघ ऑस्ट्रेलियाला रवाना होणार
टीम इंडिया ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी T20 विश्वचषक स्पर्धेसाठी 5 ऑक्टोबरला भारत सोडणार आहे. याआधी रोहित शर्मा आणि कंपनी 4 ऑक्टोबरला इंदूरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेतील तिसरा आणि शेवटचा वनडे सामना खेळणार आहे. या सामन्यानंतर खेळाडूंना घरी जाऊ दिलं जाणार नाही. त्यांना थेट ऑस्ट्रेलियाचे विमान पकडावं लागणार आहे. अशी प्राथमिक माहिती समजत आहे.
दरम्यान, विराट कोहलीने आफ्रिकन संघाविरुद्धच्या शेवटच्या सामन्यातून विश्रांती घेतल्यानंतर दोन दिवस मायदेशी जाण्याचा निर्णय घेतला. त्याची ही इच्छा संघ व्यवस्थापनाने मान्य केली आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात (Ind vs sa 2T-20 Match) भारताने 16 धावांनी विजय मिळवला आहे. भारताच्या 238 धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ 221 धावा करू शकला. यामध्ये डेव्हिड मिलरची (David Miller) 106 धावांची झुंजार शतकी खेळी व्यर्थ गेली.