कुलदीप यादवची कमाल, दक्षिण आफ्रिकेचं 99 धावांवर `काम तमाम`
कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर आफ्रिकेच्या फलंदाजांची उडाली दाणादाण
Sport News : भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधील (Ind vs Sa 3rd ODI) तिसऱ्या आणि अंतिम सामन्यामध्ये दक्षिण आफ्रकेचा संघ 99 धावांमध्ये गुंडाळला आहे. शिखर धवनने (Shikhar Dhawan) टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारताच्या गोलंदाजांनी हा निर्णय सार्थकी ठरवत आफ्रिकेला 99 धावांवर रोखलं. क्लासेनने सर्वाधिक 34 धावांची खेळी केली तर भारताकडून कुलदीप यादवने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. भारताला आता जिंकण्यासाठी 100 धावांचं आव्हान आहे. (Trending ind vs South africa 3rd odi match cricket marathi news)
आफ्रिकेचा संघ फलंदाजीला आल्यावर त्यांची सुरूवात निराशाजनक झाली. वॉशिंग्टनने डिकॉकला 6 धावांवर माघारी पाठवलं, त्यानंतर सिराजने जानेमन मलानला 15 धावांवर बाद करत सलामीची जोडी माघारी पाठवली. मधल्या फळीतील हेनरिक्स आणि मारक्रमलाही खेळपट्टीवर जास्त वेळ काही तग धरू दिला नाही. शाहबाज आणि सिराजे यांना बाद केलं.
या सामन्यात कर्णधार असलेल्या डेव्हिड मिलरलाही मोठी खेळी करता आली नाही. वॉशिंग्टनच्या गोलंदाजीवर बोल्ड झाला. क्लासेनने एक बाजू लावून धरली होती परंतू त्याला दुसऱ्या कोणत्याही फलंदाजाची साथ मिळाली नाही. शाहबाज अहमदने खेळपट्टीवर टिकून राहिलेल्या क्लासेनला बाद केलं. त्यानंतर तळाचे फलंदाज कुलदीपच्या फिरकीपुढे जास्त वेळ टिकू शकले नाहीत. अखेर 99 धावांवर आफ्रिकेचा डाव आटोपला.