Asia Cup 2022: येत्या शनिवारपासून क्रिकेटप्रेमींवर भूत असणार आहे ते आशिया कपचं. हा आशिया कप म्हणजे प्रत्येक भारतीयांसाठी करो की मरो वाली स्थिती असते. कारण या आशिया कपमध्ये रंगतो तो म्हणजे हाय होल्टेज ड्रामा. या आशिया कपमध्ये भारत - पाकिस्तान एकमेकांच्या समोरासमोर येतो. ही मॅच म्हणजे प्रत्येक भारतीयांसाठी खूप खास असते. 28 ऑगस्ट म्हणजे येत्या रविवारी प्रत्येक भारतीय हा टीव्ही समोर दिसणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडिया हा स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे. त्याने 7 वेळा विजेतेपद पटकावले आहे. यंदाही आशिया कपची ट्रॉफी भारत आणणारे असं प्रत्येक क्रिकेटप्रेमींना वाटतं. या ट्रॉफीचा खरा मानकरी कोण आहे हे 11 सप्टेंबरला ठरणार आहे. या सुंदर ट्रॉफीचा एक व्हिडिओ समोर आला आहे.  (trending news asia cup 2022 the winning team of asia cup will get this beautiful trophy the first video is out india vs pakistan)


आशिया कप 2022मध्ये एकूण 6 संघांना संधी देण्यात आली आहे. ही स्पर्धा 1984 पासून खेळवली जात आहे. आशिया कपमध्ये एकदिवसीय आणि टी-20 अशा दोन्ही फॉरमॅटमध्ये खेळला जाणार आहे. यामध्ये भारत आणि पाकिस्तान व्यतिरिक्त श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तानला संधी देण्यात आली आहे. सहावा संघ क्वालिफायरद्वारे निश्चित केला जाईल.


भारतीय संघ 13 वेळा आशिया कपमध्ये सहभागी झाला आहे. 6 वेळा फायनल जिंकली आहे, तर एकूण 7 वेळा आशिया चषकाचे विजेतेपद पटकावलं आहे. यामध्ये एकदिवसीय फॉरमॅटमधील 6 आणि टी-20 फॉरमॅटमधील एका विजेतेपदाचा समावेश आहे. तर 2016 मध्ये केवळ टी-20 फॉरमॅटमध्ये आयोजित करण्यात आला होता.



श्रीलंकेचा संघ प्रत्येक वेळी मैदानात उतरला


आशिया चषकाचा हा 15वा सीझन आहे. तर श्रीलंकेचा संघ सर्वाधिक 14 वेळा म्हणजे प्रत्येक वेळी स्पर्धेत उतरला आहे. पाकिस्तान आणि बांगलादेशही प्रत्येकी 13 वेळा मैदानात उतरले आहेत. तर भारतानंतर श्रीलंका हा या स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ आहे. श्रीलंकेने 5 वेळा विजेतेपद पटकावले आहे. तर श्रीलंका संघ  6 वेळा उपविजेता ठरला आहे. दुसरीकडे, पाकिस्तानच्या संघाने दोनदा अंतिम फेरी जिंकली आहे, तर दोनदा उपविजेतेपद पटकावले आहे. 


तब्बल 4 वर्षांनंतर ही स्पर्धा होणार आहे. 2018 मध्ये यूएईमध्ये शेवटचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर भारतीय संघ चॅम्पियन झाला. त्याची स्पर्धा कोरोनामुळे खंडित झाली होती.पुढील वर्षी ही स्पर्धा पाकिस्तानमध्ये एकदिवसीय स्वरूपात खेळवली जाईल. तर पुढील वर्षी वनडे वर्ल्ड कप हा भारतात रंगणार आहे.