`म्हणून मुली बिहारींशी लग्न करत नाहीत`, एमएस धोनीवर वर्णद्वेषी कमेंट... युजर्स संतापले
M S Dhoni : भारतीय क्रिकेट इतिहातील सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये महेंद्र सिंग धोनीचा समावेश होतो. धोनीचा संपूर्ण भारतीयांना अभिमान आहे, पण सध्या एम एस धोनी आणि त्याच्या कुटुंबियांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून त्याच्यावर वर्णद्वेषी कमेंट करण्यात आली आहे.
M S Dhoni : भारतीय क्रिकेट इतिहातील सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये महेंद्र सिंग धोनीचा (MS Dhoni) समावेश होतो. धोनीचा संपूर्ण भारतीयांना अभिमान आहे. एम एस धोनीच्या नेतृ्त्वाखाली टीम इंडियाने (Team India) आयीसीसची सर्व जेतेपदं पटकावण्याची किमया केली आहे. धोनीने भारतीयांना अभिमानाचे अनेक क्षण दिले. पण सध्या एम एस धोनी आणि त्याच्या कुटुंबियांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून त्याच्यावर वर्णद्वेषी कमेंट करण्यात आली आहे. @lohpurush_stark या अकाऊंटवरुन सोशल मीडियावरच्या एक्स हँडलवर एम एस धोनीच्या कुटुंबाचा फोटो शेअर करण्यात आला आहे.
धोनीच्या कुटुंबाचा फोटो
या फोटोत एम एस धोनी, त्याची पत्नी साक्षी आणि मुलगी जीवा दिसत आहेत. या फोटोबरोबर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे, त्यात 'मुली बिहारींशी लग्न का करत नाहीत, हे आहे कारण' असं लिहिण्यात आलेलं आहे. या पोस्ट मागचं कारण स्पष्ट नाही. पण ही पोस्ट धोनीवर वर्णद्वेषी (Racist) टीका करणारी असल्याचं युजर्सचं म्हणणं असून युजर्सने संताप व्यक्त केला आहे.
धोनी आणि कुटुंब अनंत-राधिकाच्या लग्नात सहभागी
आशियाती सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह सोहळा मुंबईतल्या जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये पार पडला. या सोहळ्यात हॉलिवूड, बॉलिवूड, क्रिकेट आणि विविध क्षेत्रातील दिग्गज आणि सेलिब्रेटी सहभागी झाले होते. टीम इंडियाचा माजी कर्णधार एम एस धोनीसुद्धा आपल्या कुटुंबासह या विवाह सोहळ्यात सहभागी झाले होते. इतर सेलिब्रेटींप्रमाणेच धोनीचा फोटोही सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. पण या फोटोवरुन एका युजरने वर्णद्वेषी टीका केली आहे.
ट्रोलरने एमएस धोनीच्या रंगा आणि कपड्यांवरुन खिल्ली उडवली आहे. या पोस्टवर युजर्सकडून संताप व्यक्त केला जात असून युजर्सने पोस्टमागे नेमका काय हेतू आहे हे स्पष्ट करायला सांगितलं. यावर ट्रोलर्सने अनुवांशिकतेमुळे बिहारींचा रंग गडद असतो असं उत्तर दिलं. तसंच जीवाचा ड्रेसिंगसेन्सही खराब असल्याचं त्याने म्हटंलय. यावर युजर्सने ट्रोलरलचा चांगलच सुनावलं आहे. नऊ वर्षांच्या मुलीवर अशी टीका करताना लाज वाटत नाही का असा संताप व्यक्त केला.
एका युजरने ट्रोलरला सुनावताना धोनी त्याची बाईक साफ करण्यासाठी तुझ्या सारख्या एक लाख लोकाना कामावर ठेवेल असं म्हटलं आहे. तर एका युजरने तुमच्या सारख्या वाईट मानसिकता असलेल्या लोकांमुळेच विराट आणि अनुष्का मुलांना घेऊन लंडनमध्ये राहात असल्याचं म्हटलं आहे. अवघ्या 9 वर्षांच्या लहान मुलीला ट्रोल केलं जात असल्याने संतापाची लाट पसरली आहे.