Sport News :  टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय खेळाडू सुर्यकुमार यादवने केलेल्या बॅटींगचं कौतुक जगभरातील क्रिकेटप्रेमी आणि माजी खेळाडू करताना दिसत आहेत. सोशल मीडियावर सुर्या कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. अशातच सुर्या आणि ऑस्ट्रेलियाची महिला क्रिकेटपटू अमांडा वेलिंगटन दोघांचे ट्विट व्हायरल झाले आहेत. परंतु नक्की दोघं चर्चेत का आले आहेत. (Trending suryakumar yadav tweet ind vs nz series australia women cricketer wellington reply tweet marathi sport news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय संघ आता T-20 आणि ODI मालिका खेळण्यासाठी न्यूझीलंडला पोहोचला आहे.  या दौऱ्यावर युवा खेळाडूंना पाठवण्यात आलं आहे. यामध्ये सुर्यकुमार यादवचाही समावेश आहे. दोन्ही संघांमधील पहिला टी-20 सामना 18 नोव्हेंबरला वेलिंग्टन इथं खेळवण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर सुर्याने न्युझीलंडमध्ये गेल्यावर हॅलो वेलिंग्टन' असं ट्विट केले. 


सुर्याने नॉर्मल ट्विट केलं पण त्याला माहित नव्हतं की पुढे काय होणार आहे. ऑस्ट्रेलियाची महिला क्रिकेटर अमांडा वेलिंग्टनने सूर्याचं ट्विट रिट्विट करत, 'हॅलो यादव' असं म्हटलं आहे. ट्विटमध्ये हसण्याचे इमोजी पाठवले आहेत. सोशल मीडियावर सूर्याचं ट्विट व्हायरल झालं असून नेटकऱ्यांनी आनंद लुटला आहे.



ऑस्ट्रेलियाची महिला क्रिकेटर अमांडा जेड वेलिंग्टन 25 वर्षांची आहे. अमांडा जेड वेलिंग्टनने ऑस्ट्रेलियासाठी 1 कसोटी, 14 एकदिवसीय आणि 8 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. अमांडा जेड वेलिंग्टन ही लेगस्पिन गोलंदाज आहे.