Trending Video : ज्या दिवसाची ज्या क्षणाची फुटबॉलचा देव लिओनेल मेस्सीसह (Lionel Messi) अख्खा अर्जेंटिना (Argentina video) वाटतं पाहत होतं तो क्षण जेव्हा 36 वर्षांनी आला. मग काय अर्जेंटिनाचा संघ आणि अख्ख अर्जेंटिना विजयाच्या जल्लोषात न्हाऊन निघालं होतं.  फिफा फुटबॉल वर्ल्ड कपवर (FIFA Football World Cup 2022) आपलं नाव कोरल्यानंतर सर्वत्र आनंदाचं वातावरण होतं. जो तो सेलिब्रेशनमध्ये (celebration) रंगला होता. अर्जेंटिनाचा संघ बसमधून ट्रॉफीसह रॅलीसाठी (Rally)  निघाला आणि त्यांचा सोबत एक दुर्घटना...


काय घडलं नेमकं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सगळीकडे उत्साहाचं वातावरण, गाण्यावर नाचणारे अर्जेंटिनाची लोक, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर विजयाचा आनंद ओसंडून वाहत होता अशातच मेस्सीसह अर्जेंटिनाचा संघ थोडक्यात बचावला. नाही तर या विजयाच्या उत्सावाला विरजण लागलं असतं. (trending video Argentina team with Messi thrill of the accident while celebrating the victory viral on Social media)


जेव्हा टॉफी घेऊन मेस्सीसह संघ बसमधून जात होता. तेव्हा मेस्सीसह पाच खेळाडू हे बसच्या छतावर बसले होते. गर्दीतून बस हळूहळू पुढे जातं होती, अचानक खेळाडूंसमोर विजेची तार आली आणि...


आनंदात कोणाचंही लक्ष नव्हतं पण एका खेळाडूचं लक्ष गेलं आणि त्याने सर्वांना खाली वाकण्याचा इशारा दिला. त्यामुळे मेस्सीसह हे पाच खेळाडू थोडक्यात वाचले. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एका खेळाडूची टोपी खाली पडली. त्यावरुन तुम्ही अंदाज लावू शकता, किती मोठी दुर्घटना टळली आहे. असं म्हणतात ना काळ आला होता पण वेळ नाही, बस्स काहीसं ते असंच घडलं. 


मेस्सीसह या खेळांडूना विजेचा धक्का बसला असताना आणि हे खेळाडू खाली पडले असते. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विजयानंतर टीम अर्जेंटिनामध्ये पोहोचली तेव्हा विमानतळापासून एक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं.  या रॅलीच्या वेळी ही घटना घडली. 



फिफा वर्ल्डकपमध्ये अर्जेंटीनाचा विजय


सर्वात रोमहर्षक आणि अखेरच्या क्षणापर्यंत श्वास रोखून धरायला लावणाऱ्या फायनलमध्ये अर्जेंटीनाने थरारक विजय मिळवलाय. फिफाच्या अंतिम सामन्यात पेनल्टी शूट आऊटवर (Penalty shootout) अर्जेंटिनाने फ्रान्सवर 4-2 अशी मात केली आणि 36 वर्षानंतर पुन्हा एकदा वर्ल्ड कप जिंकला. अर्जेंटिनासाठी मेस्सी (Lionel Messi) आणि डी मारियाने पहिल्या हाफमध्ये दोन गोल करत विजयी आघाडी घेतली. तर अखेरीस अर्जेंटिनाने 4-2 (Argentina vs France) असा विजय साकारत तिस-यांदा वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं.