मुंबई : क्रिकेटवर्तुळाचं लक्ष आशिया कपकडे लागले असताना, एका स्टार क्रिकेटपटूच्या निवृत्तीच्या चर्चा सुरु झालीय.  त्यामुळे ऐन आशिया कपच्या तोंडावर हा खेळाडू निवृत्ती का घेतोय? हा स्टार खेळाडू आहे तरी कोण ते जाणून घेऊय़ात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यूझीलंडचा स्टार वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट यांच्या निवृत्तीची चर्चा सुरु झालीय. टेस्ट क्रिकेटमधून तो निवृत्ती घेणार असल्याचे क्रिकेट वर्तुळात रंगली आहे. ट्रेट बोल्टच्या एका भूमिकेनंतर आणि न्युझीलंड एका माजी क्रिकेटरने केलेल्या विधानानंतर चर्चेला उधाण आले आहे. 


ट्रेट बोल्ट काय म्हणाला? 
ट्रेंट बोल्ट अलीकडेच क्रिकेट न्यूझीलंडच्या केंद्रीय करारापासून दुर झाला आहे. बोल्टने स्वत: बोर्डाला विनंती केल्यानंतर न्यूझीलंडच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट लिस्टमधून त्याची सुटका करण्यात आली. करारातून सुटका केल्यानंतर आता ट्रेंट बोल्टच्या टेस्टमधील निवृत्तीची चर्चा सुरु झालीय.  


माजी क्रिकेटरचं विधान काय? 
ट्रेंट बोल्ट न्यूझीलंडच्या केंद्रीय करारापासून दुर झाल्यानंतर न्यूझीलंडचा माजी यष्टीरक्षक फलंदाज इयान स्मिथ याने यावर आपलं विधान केलं आहे. स्मिथ म्हणालाय, बोल्टची कसोटी क्रिकेट कारकीर्द संपुष्टात येण्याचे हे लक्षण आहे. यामुळे 
देशाच्या क्रिकेटचे मोठे नुकसान होईल.  


बोल्ट आणि टीम साऊदी ही वेगवान गोलंदाजांची जोडी न्यूझीलंडसाठी कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम जुगलबंदी आहे. स्मिथ म्हणाला की, "मला वाटते मध्यवर्ती करारातून सुटणे हा कदाचित त्याच्या कसोटी कारकिर्दीचा शेवट आहे. तसेच ही लाजिरवाणी गोष्ट आहे कारण साऊथी/बोल्ट ही कदाचित सर्वोत्तम जोडी होती. "बोल्टच्या कमतरतेचा टीम साऊदीवर परिणाम होईल कारण त्याला दुसऱ्या टोकाकडून पूर्वीसारखा पाठिंबा मिळणार नाही." असेही स्मिथ म्हणालाय. 


रॅकींग 
इंग्लंडचे जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड (129 कसोटीत 973 विकेट्स), वेस्ट इंडिजचे कर्टली अॅम्ब्रोस आणि कोर्टनी वॉल्श (95 सामन्यांत 762 बळी) आणि पाकिस्तानचे वसीम अक्रम आणि वकार युनूस (61 कसोटीत 559 बळी) या सुरूवातीच्या टॉपच्या तीन जोड्या आहेत.  न्यूझीलंडमधून यशस्वी विकेट घेणाऱ्यांमध्ये ही जोडी अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहे. सौदीने 347 तर बोल्टने 317 विकेट घेतल्या आहेत. 


वर्ल्डकप खेळणार
ट्रेंट बोल्ट क्रिकेट न्यूझीलंडपासून पूर्णपणे वेगळा झालेला नाही आहे. ऑस्ट्रेलियात ऑक्‍टोबरमध्‍ये होणार्‍या टी-20 विश्‍वचषकासाठी बोल्ट सौदीसह न्यूझीलंड संघात सहभागी होण्याची अपेक्षा आहे.


दरम्यान न्यूझीलंडसाठी क्रिकेट करारातून बाहेर पडणे आणि इयान स्मिथच्या बोल्टची कसोटी क्रिकेट कारकीर्द संपुष्टात येण्याच्या विधानानंतर ट्रेंट बोल्टच्या टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीची चर्चा सुरु झालीय.मात्र त्याने प्रत्यक्षात निवृत्तीची कोणत्याही प्रकारची घोषणा केली आहे. या निव्वळ फक्त चर्चा आहेत.