इंग्लंड-न्यूझीलंड सेमीफायनल सामन्याआधी या भारतीयाला दिली गेली श्रद्धांजली
सामन्यापूर्वी दोन्ही संघांच्या खेळाडूंनी एक मिनिट मौन पाळले.
दुबई : आयसीसी टी-20 विश्वचषक (T20 world cup) आता समारोपाच्या दिशेने वाटचाल करत आहे. या स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीत बुधवारी न्यूझीलंडचा सामना माजी विजेत्या इंग्लंडशी होत आहे. या सामन्यापूर्वी दोन्ही संघांच्या खेळाडूंनी भारतीय खेळपट्टीचे क्युरेटर मोहन सिंग (Mohan Singh) यांच्या स्मरणार्थ एक मिनिट मौन पाळले. पहिल्या उपांत्य फेरीच्या आयोजनाची जबाबदारी मिळालेल्या अबुधाबीच्या मैदानाची खेळपट्टी पाहण्याची जबाबदारी मोहन यांच्यावर होती. (England vs new zealand semifinal)
भारतातील उत्तराखंड येथील मोहन सिंग यांनी UAE मध्ये पिच क्युरेटरची भूमिका स्वीकारण्यापूर्वी मोहाली स्थित पिच क्युरेटर दलजीत सिंग यांच्यासोबत काम केले होते. आपल्या कामाची आवड असल्याने उत्तराखंडमधील मोहन यूएईला पोहोचले. टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या सामन्यादरम्यान दोन्ही संघांच्या खेळाडूंनी एक मिनिट मौन पाळले.
गेल्या रविवारी न्यूझीलंड आणि अफगानिस्तान यांच्यातील सामन्यापूर्वी मोहन यांचं निधन झालं. अबू धाबी क्रिकेट, ग्राउंड स्टाफ आणि मोहनच्या कुटुंबीयांच्या विनंतीनंतर सामना सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. ICC ने देखील याबाबत शोक व्यक्त केला आहे.
मोहन सिंग (Mohan singh) 2000 साली यूएईला आले होते. याआधी त्यांनी मोहालीत बीसीसीआयचे प्रसिद्ध पिच क्युरेटर दलजीत सिंग (Daljeet singh) यांच्यासोबत काम केले होते.