नवी दिल्ली : खेळ जगतातील सर्वात प्रसिद्ध असलेल्या खेळांपैकी एक म्हणजे डब्ल्यूडब्ल्यूई (WWE) आता भारताची राजधानी दिल्लीत खेळवण्यात येत आहे. दिल्लीमध्ये आठ आणि नऊ डिसेंबर रोजी फाईट होणार आहे.


ट्रिपल एचचं आव्हान 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रसिद्ध रेसलर ट्रिपल एचने भारतीय वंशाचा कॅनेडियन रेसलर जिंदर महल याला एक आव्हान दिलं होतं. हे आव्हान महलने स्विकारलं आहे. 


ट्रिपल एचने जिंदरला दिली धमकी 


आता या महामुकाबल्यासाठी जवळपास एक आठवडा शिल्लक राहीला आहे. मात्र, या मॅचपूर्वीच WWE रेसलर आणि WWE सीओओ ट्रिपल एचने जिंदरला एक धमकी दिली आहे.


व्हिडिओ मेसेज 


१४ वेळा वर्ल्ड चॅम्पियनने आपल्या विरोधकांसाठी एक व्हिडिओ संदेश रेकॉर्ड करुन पाठवला आहे. त्याने या मेसेजमध्ये म्हटलं आहे की, "मी WWE रिंगमध्य पून्हा उतरण्यास तयार आहे जेणेकरुन जिंदर महलला धडा शिकवता येईल".


भारतीयांसमोर जिंदर महलला धडा शिकवायचा आहे आणि त्यासाठी ९ डिसेंबरला दिल्लीत दाखल होत आहे असेही ट्रिपल एचने म्हटलं आहे.



ज्यावेळी तु माझ्या रिंगमध्ये येशील त्यावेळी तु दिसणारही नाहीस. आता तुला माझ्या रिंगमध्ये यायचं आहे. मी तुला नवी दिल्लीत पाहून घेईल असेही ट्रिपल एचने म्हटलंयं.