New Controversy Over Celebration 5000 Deaths Connection: युरोपियन फुटबॉल स्पर्धांचं नियंत्रण आणि देखरेख करणारी प्रशासकीय संस्था असलेल्या युईएफएने बुधवारी तुर्कीच्या संघामधून सेंटर बॅक पोझिशनवर खेळणाऱ्या मेरिह डेमिरलने केलेल्या सेलिब्रेशन प्रकरणात चौकशी सुरु केली आहे. मेरिहने गोल केल्यानंतर हात उंचावून 'वुल्फ सॅल्यूट' केल्याने नवीन वादाला तोंड फुटलं आहे. जर्मनीने तुर्कीच्या खेळाडूच्या या सेलिब्रेशनचा निषेध केला आहे. जर्मनीमधील अती उजव्या संघटनेचं प्रतिक म्हणून या वुल्फ सॅल्यूटकडे पाहिलं जातं. असे सेलिब्रेशन करणं म्हणजे वर्णद्वेषाला पाठिंबा देण्यासारखं असल्याचं म्हणत जर्मनीने या कृतीचा निषेध केला आहे. 


नेमकं घडलं काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

26 वर्षीय बचावपटू असलेल्या मेरिहने युरो 2024 च्या टॉप-16 फेरीमधील सामन्यात केलेल्या कृतीमुळे वाद निर्माण झाला आहे. या सामन्यामध्ये तुर्कीच्या संघाने ऑस्ट्रियावर 2-1 ने शानदार विजय मिळविल्यानंतर मेरिहने चाहत्यांकडे पाहात हात डोक्यावर नेत बोटांनी लांडग्याच्या डोक्याच्या आकाराची खूण केली. मेरिहने केलेली ही कृती तुर्कीमधील नॅशनॅलिस्ट मूव्हमेंट पार्टी म्हणजेच एमएचपी या 'ग्रे वुल्व्ह्स'शी संलग्न असेलल्या सॅल्यूटशी जोडली जाते. सध्या सत्तेत असलेल्या तय्यप एर्दोगन यांच्या सत्ताधारी एके पक्षाचा हा मित्रपक्ष आहे.


जर्मनीच्या गृहमंत्र्यांनी केली टीका


"तुर्कीमधील उजव्या विचारसरणीच्या अतिरेक्यांच्या चिन्हांना आमच्या स्टेडियममध्ये स्थान नाही," असं जर्मनीच्या गृहमंत्री नॅन्सी फेसर यांनी एक्सवर एका पोस्टमध्ये म्हटले आहे. "युरोपियन फुटबॉल चॅम्पियनशिपचा वंशवादाचे व्यासपीठ म्हणून वापर करणं चुकीचं आहे," असंही फेसर यांनी म्हटलं आहे.


5000 जणांचा मृत्यू


1960 च्या दशकात स्थापन केलेल्या 'ग्रे वुल्व्ह्स' डावे आणि राष्ट्रवादी विचार सरणीच्या लोकांमध्ये झालेल्या राजकीय हिंसाचारात सहभागी संस्था होती. या हिंसाचारामध्ये 1980 च्या उठावाच्या वेळी सुमारे 5,000 लोक मारले गेल्याची नोंद आहे. 'ग्रे वुल्व्ह्स' हा अती उजवा गट फ्रान्समध्ये प्रतिबंधित आहे. 'ग्रे वुल्व्ह्स'वर फ्रान्सने बंदी घातली असून या गटाशी संबंधित कारवाया कायद्याने गुन्हा मानल्या जातात. ऑस्ट्रियामध्येही 'ग्रे वुल्व्ह्स'चं प्रतिकात्मक चिन्ह प्रतिबंधित आहे. या प्रकरणावरुन वाद निर्माण झाल्यानंतर यूईएफएने मेरिहच्या या 'कथित अयोग्य वर्तनाची' तपासणी केली जाणार असल्याची घोषणा केली. स्पर्धेदरम्यान झालेल्या या गैरवर्तनावर कारवाई केली जाणार आहे.


नक्की वाचा >> 'निर्ल्लज संधीसाधू...', रोहित शर्मा, विराटचा उल्लेख करत जय शाहांवर टीका; 'जगभरात कुठेही...'


हे 2 खेळाडू चौकशीच्या कचाट्यात


अल्बेनियाच्या मिरलिंड डाकूवरही दोन सामन्यांसाठी बंदी घालण्यात आली आहे. मिरलिंडने चाहत्यांना आक्षेपार्ह घोषणा देण्यास भाग पाडल्याचा आरोप केला जात आहे. इंग्लंडच्या ज्यूड बेलिंगहॅमचीही क्रॉच-ग्रॅबिंग हावभावासाठी चौकशी केली जणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.