महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण; सातपुडा पर्वतात रांगेतील छुपं पठार, खास सुर्योदय पाहण्यासाठी येतात पर्यटक

महाबळेश्वर तर सर्वांनाच माहित आहे. जाणून घेऊया महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण कोणते आहे. 

| Nov 30, 2024, 23:47 PM IST

Toranmal Hill Station In Satpuda : महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय आणि पहिल्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण आहे. सह्याद्रीच्या पर्वत रांगते असलेले सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर हे देशभरात पर्यटकांना भुरळ घालते. निसर्ग सौैंदर्याने नटलेल्या महाबळेश्वरमध्ये अनेक टूरीस्ट पॉईंट आहेत. महाबळेश्वरला टक्कर देते महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण. जाणून घेऊया हे ठिकाण कोणते? 

1/10

महाबळेशव्र हे महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकांचे थंड हवेचे ठिकाण आहे. पण, दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण कोणते माहित आहे का? 

2/10

खास सुर्योदय पाहण्यासाठी येथे पर्यटक येतात. इथला सूर्यास्त पाहण्याचा अनुभव देखील अविस्मरणीय असाच आहे. 

3/10

 तोरणमाळला पोहोचल्यावर दृष्टीस पडतो तो दूरवर पसरलेला यशवंत तलाव.

4/10

सातपुडा पर्वतात पंचमढी आणि अमरकंटकाच्या खालोखाल तोरणमाळचे पठार उंच आहे. 

5/10

सातपुड्याच्या चौथ्या पर्वतरांगेत नंदुरबार जिल्ह्यात तोरणमाळ हा परिसर मोडतो.

6/10

 तोरणमाळ परिसरात धुक्याची चादर पाहायला मिळत आहे. 

7/10

 तोरणमाळ परिसरात  गुलाबी थंडीचा आनंद घेण्यासाठी पर्यटक गर्दी करत आहेत.

8/10

तोरणमाळ परिसरातलं तापमान सध्या 10 अंश सेल्सिअसपर्यंत पोहचले आहे.

9/10

कडाक्याच्या थंडीत नंदुरबार जिल्ह्यातल्या सातपुडा डोंगररांगांमध्ये निसर्गाच्या विविध छटा पाहायला मिळत आहे. 

10/10

तोरणमाळ हे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण आहे.