एकाच दिवशी २ क्रिकेटपटूंचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू
क्रिकेट खेळता ह्रद्य विकाराच्या झटका आल्यामुळे एकाच दिवसात दोन तरुण खेळाडूंचा मृत्यू झाल्याची दुख:द घटना घडली आहे.
मुंबई : क्रिकेट खेळता ह्रद्य विकाराच्या झटका आल्यामुळे एकाच दिवसात दोन तरुण खेळाडूंचा मृत्यू झाल्याची दुख:द घटना घडली आहे. पहिली घटना आहे गोव्यातील. गोव्याच्या मडगाव इथं एका रणजीपटूचा मैदानात हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. राजेश घोडगे असं या रणजीपटूचं नाव आहे. गोव्यातील मडगाव इथं सकाळपासून मडगाव क्रिकेट क्लबचे सामने सुरु आहेत. या सामन्याच्या दुसऱ्या सत्राचा खेळ सुरु असताना राजेशला मैदानात हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि तो मैदानातच कोसळला. त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचाराला प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्याला दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण तिथं त्याला मृत घोषित करण्यात आलं.
रणजीपटू राजेश घोडके
राजेश घोडकेवर उपचार
तर दुसरीकडे नवी मुंबईच्या घणसोली येथील संदिप म्हात्रे याचा क्रिकेट खेळत असताना अचानक छातीत दुखायला लागलं. त्यानंतर त्याला घरी नेण्यात आलं मात्र घरी संदिप म्हात्रे याला तीव्र ह्रदय विकाराचा झटका आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.
एमसीसी मेंबर्स टूर्नामेंट मडगावच्या राजेंद्र प्रसाद स्टेडियमवर सुरु होती. एमसीसी ड्रॅगन्स आणि एमसीसी चॅलेंजर्स यांच्यामध्ये हा सामना सुरु होता. एमसीसी चॅलेंजर्सकडून खेळत असताना राजेश नॉन-स्ट्रायकर एन्डला उभा होता. ३१ रनवर नाबाद खेळत असतानाच राजेश मैदानात कोसळला. दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. जवळच्या इएसआय रुग्णालयात राजेशला हलवण्यात आलं. रुग्णालयात राजेशला हार्ट पंपिंग आणि काही औषधंही देण्यात आली होती.
१९९९-२००० च्या मोसमात राजेशनं पदार्पण केलं. दोन प्रथम श्रेणी मॅचमध्ये राजेशनं ७६ रन केले होते. तसंच तो गोव्याकडून ८ लिस्ट ए मॅच खेळला होता. या मॅचमध्ये त्यानं एका अर्धशतकासह ११५ रन केले होते.