मुंबई : आयपीएलनंतर टीम इंडिया दक्षिण आफ्रिका विरुद्ध (Team India vs South Africa) 5 सामन्यांची टी 20 सीरिज खेळणार आहे. या सीरीजमध्ये आयपीएसमध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या युवा खेळाडूंना टीम इंडियात संधी देण्यात येणार आहे. त्यामुळे प्रथमच हे खेळाडू भारताची जर्सी घालून मैदानात उतरणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएलमध्ये सर्वांत फास्ट बॉलिंग टाकणाऱ्या गोलंदाज उमरान मलिक आणि अर्शदीप सिंह या दोन युवा गोलंदाजांना स्थान देण्यात आले आहे. दोघांचीही आयपीएलमध्ये गोलंदाजी चांगली राहिलीय. त्यामुळे या दोन्ही खेळाडूंना टीम इंडीयात संधी मिळाली आहे. उमरान मलिक आणि अर्शदीप सिंह भारतीय संघात कशी कामगिरी करतात, हे पहावं लागेल.  


टी 20 मालिकेचं वेळापत्रक
      मॅच                         तारीख                  ठिकाण


पहिला सामना                  9 जून                  दिल्ली
दुसरा सामना                 12 जून                  कटक
तिसरी मॅच                    14 जून                  वायझॅग
चौथा सामना                  17 जून                 राजकोट
पाचवी मॅच                    19 जून                 बंगळुरु



टी20 सीरीजसाठी दक्षिण आफ्रिका टीम 
टेम्बा बावुमा (कॅप्टन), क्वींटन डी कॉक, रीजा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, एडेन मार्कराम, डेविड मिलर, लुंगी एन्गिडी, एनरिक नोर्टजे, वेन पार्नेल, ड्वेन प्रिटोरियस, कगिसो रबाडा, तबरेज शम्सी, ट्रिस्टन स्टब्स, रस्सी वॅन डेर डूसन आणि मार्को जेन्सन.


टीम इंडिया
केएल राहुल (कॅप्टन), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, व्यंकटेश अय्यर, वाय चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आर बिश्नोई, भुवनेश्वर, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग आणि उमरान मलिक.