U19 T20 World Cup Final, INDW vs ENGW Video : क्रिकेटसाठी कालचा रविवार हा भारतीय संघाचा होता. एकीकडे पोरींनी अंडर -19 टी-20 वर्ल्डकपवर आपलं नाव कोरलं. दुसरीकडे भारत आणि न्यूझीलंड (india vs new zealand) यांच्यातील तीन टी-20 मालिकेतील दुसरा सामन्यात विजय मिळवत, मालिकेवर कब्जा मिळवला. अंडर -19 टी-20 वर्ल्डकपमच्या (Team India win under 19 T20 womens World Cup) फायनलमध्ये इंग्लंडचा पराभव करत पोरींनी इतिहास रचला. विशेष म्हणजे ही टूर्नामेंट जिंकणारा भारत पहिला संघ ठरला आहे. त्यामुळे पोरींचा जल्लोष तर होणार ना राव...


चॅम्पियनचा जल्लोष!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विजयानंतर भारतीय संघाच्या पोरी  Kala Chashma गाण्यावर थिरकल्या. या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.  या विजयी जल्लोषाचा व्हिडीओ खुद्द आयसीसीनेच शेअर केला आहे. या पोरींवर देशातून सगळीकडून शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. 



टीम इंडियाच्या फलंदाजींनी 69 रन्सचं आव्हान अवघ्या 14 ओव्हर्समध्ये पार पाडलं. गोलंदाजीनंतर फलंदाजीमध्ये उत्तम कामगिरी करत टीम इंडियाच्या मुलींनी वर्ल्डकपवर कब्जा मिळवला आहे. 7 विकेट्सने भारताच्या मुलींनी इंग्लंडवर विजय मिळवला आहे. मुख्य म्हणजे ही टूर्नामेंट जिंकणारा भारत पहिला संघ ठरला आहे.


इतिहास रचला!


जेव्हा भारतीय संघ विजयी होतो तेव्हा त्यांचे ड्रेसिंग रूममधील (Dressing Rooms Video) अनेक जल्लोषाचे व्हिडीओ आपण पाहिले आहेत. पण पहिल्यांदाच पोरींचा हा जल्लोष पाहून प्रत्येक भारतीयांची मान अभिमानाने उंच होतं आहे. 



ही तर सुरुवात !


आजपर्यंत आपण पोरांचा जल्लोष पाहिला आता पोरींचा जल्लोष पाहण्यासाठी तयार राहा. कारण आता भारताच्या महिला क्रिकेट संघातील लेडी सेहवाग (Lady Sehwag) म्हणून ओळखली जाणारी शेफाली वर्माने (Shafali Verma) अंडर-19 महिला वर्ल्ड कपवर (U-19 World Women Cup) नाव कोरलं आहे. आता भारताचा या पोरी थांबायच्या नाहीत. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by ICC (@icc)


दरम्यान टीम इंडियाच्या फलंदाजींनी 69 रन्सचं आव्हान अवघ्या 14 ओव्हर्समध्ये पूर्ण केलं. तर टीम इंडियाच्या फलंदाजांकडून त्रिशा आणि सौम्या तिवारीने सर्वाधिक 24 रन्सची खेळी केली. तर कर्णधार शेफाली वर्मा अवघ्ये 15 धावा काढल्या. तरीदेखील पोरींनी टारगेट 3 विकेट्स गमावत सहजतेने पूर्ण केलं.