U19 T20 World Cup 2025 : आयसीसीने मलेशियाला होणाऱ्या आगामी अंडर 19 महिला टी 20 वर्ल्ड कप 2025 ची घोषणा केली आहे. या वर्ल्ड कपचे शेड्युल सुद्धा आयसीसीने जाहीर केले असून या स्पर्धेला 18 जानेवारी 2025 रोजी सुरुवात होईल. तर फायनल सामना हा 2 फेब्रुवारी रोजी खेळवण्यात येईल. या स्पर्धेत यंदा 16 टीम सहभागी होणार असून यांच्यात एकूण 44 सामने खेळवले जातील. अंडर 19 महिला टी 20 वर्ल्ड कपचं हे दुसरं वर्ष असून 2023 मध्ये झालेल्या पहिल्या वर्ल्ड कप भारताच्या महिला संघाने जिंकला होता. 


भारत कोणत्या ग्रुपमध्ये? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मलेशियामध्ये आयोजित होणाऱ्या अंडर 19 टी 20 महिला वर्ल्ड कपमध्ये 16 संघांना चार ग्रुपमध्ये विभागण्यात आले आहे. यात ग्रुप ए मध्ये भारत, वेस्टइंडीज, श्रीलंका, मलेशिया इत्यादी संघ आहेत. तर ग्रुप बी मध्ये इंग्लंड, पाकिस्तान, आयर्लंड, अमेरिका यांचा समावेश आहे. ग्रुप सीमध्ये न्यूझीलंड दक्षिण आफ्रिका, आफ्रिकाचे क्वालिफायर आणि समोआ यांचा समावेश आहे.  ग्रुप डी मध्ये ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, आशिया क्वालिफायर आणि स्कॉटलंड इत्यादी संघ आहेत. 


हेही वाचा : IND vs AUS सीरिजपूर्वी पॅट कमिन्सचा मोठा निर्णय, क्रिकेट जगतात खळबळ; समोर आलं कारण


आयसीसी अंडर 19 महिला टी 20 वर्ल्ड कप 2025 ची सुरुवात 18 जानेवारी रोजी होणार असून या दिवशी एकूण सहा सामने खेळवले जातील. यात बी ग्रुपमधील इंग्लंडचा सामना हा आयर्लंड सोबत होईल आणि पाकिस्तानचा सामना अमेरिकेशी होईल. हे दोन्ही सामने जोहोरमध्ये होतील.  तर ग्रुप सी मध्ये सामोआचा सामना आफ्रिकेच्या क्वालिफायरशी होईल तसेच न्यूझीलंडचा सामना हा दक्षिण आफ्रिकेशी होईल. याच दिवशी ग्रुप डी मधील ऑस्ट्रेलियाचा सामना स्कॉटलंड सोबत तर बांगलादेश हा आशियातील पात्रता सामना खेळेल. भारताचा या स्पर्धेतील पहिला सामना हा 19 जानेवारी रोजी वेस्ट इंडिज सोबत होईल.