U19 वर्ल्ड कपवर पावसाचं सावट! तर कोण होणार चॅम्पियन? जाणून घ्या ICC चा नियम
वर्ल्डकप 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या टीमने भारतीय संघाला मात दिली. यासोबतच लाखो भारतीयांचे वर्ल्ड कप मिळवण्याचे स्वप्न भंगले. या पराभवाचा वचपा काढण्याची संधी आता भारताच्या अंडर 19 टीमसमोर आले. भारत आणि ऑस्ट्रेलिया पुन्हा एकदा वर्ल्ड कप फायनलमध्ये भिडणार आहेत. दोन्ही संघाचे अंडर 19 चे प्लेयर समोरासमोर येतील.
U19 World Cup Final: वर्ल्डकप 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या टीमने भारतीय संघाला मात दिली. यासोबतच लाखो भारतीयांचे वर्ल्ड कप मिळवण्याचे स्वप्न भंगले. या पराभवाचा वचपा काढण्याची संधी आता भारताच्या अंडर 19 टीमसमोर आले. भारत आणि ऑस्ट्रेलिया पुन्हा एकदा वर्ल्ड कप फायनलमध्ये भिडणार आहेत. दोन्ही संघाचे अंडर 19 चे प्लेयर समोरासमोर येतील.
19 नोव्हेंबर रोजी खेळल्या गेलेल्या एकदिवसीय वर्ल्ड कप फायनलमध्ये 'कांगारुं'नी टीम इंडियाचा पराभव केला. भारतीय टीम आणि क्रिकेट चाहत्यांच्या मनात या जखमा अजूनही ओल्या आहेत. अशावेळी टीम ऑस्ट्रेलियाला हरवून याचा वचपा काढण्याची संधी आली आहे. असे असले तरी या मॅचवर पावसाचे सावट आहे.
65 टक्के पावसाची शक्यता
भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये अंडर 19 वर्ल्ड कपचा सामना दुपारी सुरु होईल. AccuWeather ने दिलेल्या माहितीनुसार आज 65 टक्के पावसाची शक्यता आहे. वीजेच्या कडकडाटासह वेगाने हवा येण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. यासोबतच दिवसभर आकाशात ढग दाटून येतील, असा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे सामना होण्याची शक्यता फार कमी दिसत आहे. असे असेल तर मग वर्ल्ड कप फायनल रद्द होणार का? असा प्रश्न फॅन्स विचारत आहे. असे झाले तर चॅम्पियन कोन बनणार? याबद्दल ICC चा नियम काय सांगतो? हे जाणून घेऊया.
आजचा सामना रद्द झाला तर?
भारत-ऑस्ट्रेलियामधील अंतिम सामना रद्द झाला तरी चिंता करण्याचे कारण नाही. कारण फायनलसाठी एक रिझर्व दिवस ठेवण्यात आला आहे. रिझर्व ठेवलेल्या दिवशीदेखील पाऊस आला तर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांना संयुक्तपणे विजेता घोषित केले जाणार आहे.
अंडर 19 वर्ल्डकपमध्ये नॉक आऊट मॅचा निकाल लावण्यासाठी किमान 25-25 ओव्हरच्या मॅच खेळणे आवश्यक आहे, असे आयसीसी नियम सांगतो.
दोन्ही टीमचे स्क्वॉड
टीम इंडिया: उदय सहारन (कॅप्टन), आदर्श सिंह, अर्शीन कुलकर्णी, मुशीर खान, प्रियांशु मोलिया, सचिन दास, अरावेल्ली अवनीश, मुरुगन अभिषेक, राज लिंबानी, नमन तिवारी, सौमी पांडे, धनुष गौड़ा, रुद्र पटेल, अराध्य शुक्ला आणि इन्नेश महाजन (विकेटकीपर).
टीम ऑस्ट्रेलिया: ह्यूज वेइबगेन (कॅप्टन), हॅरी डिक्सन, सौम कोन्टास, हरजस सिंह, रेयान हिक्स (विकेटकीपर), ओलिवर पीक, टॉम कैंपबेल, रैफ मॅकमिलन, टॉम स्ट्रैकर, माहली बियर्डमन, कॅलम विडलर, लाचलान एटकेन, चार्ली एंडरसन, हरकीरत बाजवा आणि एडन ओ कॉनर.