माऊंट माऊंगानुई : ऑस्ट्रेलिया संघाला धूळ चारत  १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक अंतिम सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळवत चौथ्यांदा वर्ल्डकपवर आपलं नाव कोरलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीलाच कांगारुंना दणका देत सामन्यावर पकड मजबूत केली होती. ऑस्ट्रेलियाच्या झटपट विकेट घेण्यात भारतीय टीमला यश आलं.


ऑस्ट्रेलियन टीम २१६ रनवर ऑलआऊट झाली. दरम्यान एक वेगळ्याच प्रकारचं सेलिब्रेशन मैदानात पाहायला मिळाल.  दरम्यान एक वेगळ्याच प्रकारचं सेलिब्रेशन मैदानात पाहायला मिळाल.


शक्तीशाली उर्जा


हातातून एखादी शक्ती बाहेर पडावी त्याची प्रतिक्रीया खेळाडूंच्या हावभावातून दिसावी अस काहीस मैदानात पाहायला मिळालं. पृथ्वी शॉने शक्तीशाली उर्जा सोडली आणि इतर खेळाडू जमनीवर पडले.


हायपनोसीस सेलिब्रेशन


अशा प्रकारच्या सेलिब्रेशनला हायपनोसीस सेलिब्रेशन असे म्हणतात. सर्व खेळाडू एकत्र जमा होतात होऊन हवेच्या माध्यमातून जाणारी (अदृश्य) शक्ती बाहेर सोडायची. जेव्हा एखादा संघ एखाद्या सामन्यात किंवा स्पर्धेमध्ये इतरांपेक्षा खूपच वरचढ खेळ करतो त्यावेळी हे सेलिब्रेशन केले जाते.


हायपनोसीस सेलिब्रेशन 'फिफा १८' मध्ये पाहायला मिळालं होतं.