मुंबई: कोरोनामुळे IPL 2021चे स्थगित झालेले 31 सामने आता UAEमध्ये शिफ्ट करण्यात येणार असल्याची माहिती BCCIने दिली आहे. सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान हे सामने होणार आहे. बीसीसीआयच्या या निर्णयानंतर प्रत्येक फ्रांचायझीच्या ट्वीटरवर आयपीएल संदर्भात पोस्ट पडायला सुरुवात झाली. यावेळी युजवेंद्रची पत्नी धनश्री चहलला देखील दुबईचा आठवण झाली आणि तिने इन्स्टावर व्हिडीओ आणि एक फोटो शेअर केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धनश्री वर्माने इन्स्टाग्रामवर आपल्या डान्सचा व्हिडीओ शेअर केला आहे. अक्षय कुमारच्या गाण्यावर धनश्री डान्स करताना दिसत आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे आयपीएलचे सामने UAEमध्ये घेण्यात आले होते. त्यावेळी हा व्हिडीओ करण्यात आला होता. आता पुन्हा एकदा आयपीएलचे उर्वरित सामने UAEमध्ये होणार असल्याने तिने त्या आठवणींना उजाळा दिला आहे. 



इतकच नाही तर धनश्रीने आरसीबीच्या जर्सीतील खेळाडू आणि लोकांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केला असून UAEला जाण्याची तयारी कशी सुरू करण्यात आली आहे हे सांगितलं आहे. धनश्री आपले वेगवेगळे डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. तिच्या व्हिडीओला चाहत्यांनी लाईक केलं आहे. 



बीसीसीआयने घोषित केले की, कोरोनामुळे आयपीएलच्या 14 व्या मोसमातील उर्वरित सामने युएईमध्ये खेळले जातील. आयपीएल 2021 चे उर्वरित 31 सामने युएईच्या दुबई, शारजाह आणि अबू धाबी येथे खेळले जातील. हे सामने सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये 25 दिवसांच्या कालावधीत होतील. त्यानंतर भारतातच टी -20 विश्वचषक स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे.