मुंबई: दिग्गज फुटबॉलपटू रोनाल्डोनं कोका कोलाच्या दोन बाटल्या हटवून पाणी पिण्याचा सल्ला दिल्यानंतर कोका कोला कंपनीला मोठं नुकसान झालं. हे प्रकरण नुकतंच ताजं असताना आता आणखी एक दिग्गज खेळाडूचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फ्रान्सचा मिडफील्डर पॉल पोग्बा याने मंगळवारी पत्रकार परिषद सुरू होण्याआधी टेबलवर ठेवलेली बियरची बाटली उचलून बाजूला ठेवली. त्याने पाण्याची मागणी केली. यावर अधिक बोलण्यास मात्र पोग्बाने नकार दिला. त्याने मौन बाळगलं मात्र कोका कोलाच्या बाटल्या टेबलवर तशाच राहू दिल्या. पोग्बाच्या या कृतीमुळे सर्वजण हैराण झाले. त्याचा व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 



पोग्बाने कोका कोलाची बाटली टेबलवरून हटवली नाही. Heineken बियरची बाटली पोग्बाच्या समोर ठेवली होती. ती बाटली त्याने बाजूला केली आणि पाणी मागितलं. UEFA Euro चा Heineken ऑफिशियली स्पॉन्सर आहे. सध्या या घटनेवर कंपनीने पोग्बाच्या या कृतीनंतर मौन बाळगलं आहे. पोग्बानं पाणी पिण्यासाठी प्रोत्याहन दिलं आहे. 


28 वर्षीय पोग्बा फ्रान्ससाठी खेळतो आणि तो इस्लाम धर्माचं पालन करतो. याआधी अनेक इस्लाम धर्माच्या खेळाडूंनी बियरला विरोध केल्याची प्रकरणं समोर आली आहेत. इंग्लंडचा क्रिकेटर राशीद खान आणि मोइन अली हे देखील दारू-बियर असलेल्या इव्हेंटमध्ये सहभागी होणं टाळतात. 


स्टार फुटबॉलर आणि पोर्तुगीज संघाचा कर्णधार क्रिस्टियानो रोनाल्डोने युरो कपच्या पत्रकार परिषदेत टेबलावर ठेवलेली कोका कोला बाटली काढून टाकली त्यामुळे 
कंपनीला एकाच दिवसात 29,323 कोटी रुपयांचा तोटा झाला.