Jonny Bairstow Rishi Sunak : सध्या इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या मानाच्या अॅशेस मालिकेत (Ashes Series) पाहुण्या संघ ऑस्ट्रेलियाने 2-0 अशी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात कांगारूंनी गोऱ्या साहेबांचा समाचार घेतला अन् दमदार आघाडी मिळवली. मात्र, ऑस्ट्रेलियन संघाने दुसऱ्या सामन्यात रडीचा डाव खेळल्याची चर्चा सुरू आहे. त्याला कारण ठरतंय जॉनी बेअरस्टोची (Jonny Bairstow) विकेट. हा वाद इतका पेटला की थेट इंग्लंडच्या पंतप्रधानांना यावर स्टेटमेंट द्यावं लागलं. भारतीय वंशाच्या ऋषी सुनक (Rishi Sunak) यांनी थेट या वादावर बोलताना पाणउताराच काढला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जॉनी बेअरस्टोच्या वादग्रस्त रनआउटनंतर (Jonny Bairstow  Run Out Controversy) सोशल मीडियावर चांगलाच गोंधळ उडाला आहे. त्यावर आता ऋषी सुनक यांनी उडी घेत मत मांडलं आहे. पंतप्रधान हे इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सच्या (Ben Stokes) मताशी सहमत आहे. सामना जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाने जे केले तसं करणार नाही, असं ऋषी सुनक यांच्या प्रवक्त्याने म्हटलं आहे. त्याचबरोबर एमसीसी लाँग रूममध्ये उस्मान ख्वाजाबाबत जे काही झालं ते योग्य नसल्याचं मत देखील ऋषी सुनक यांनी व्यक्त केलं आहे.


आणखी वाचा - Jonny Bairstow: कांगारूंकडून रडीचा डाव? बेअरस्टो Out की Not Out? Video पाहून तुम्हीच सांगा!


एमसीसीने (MCC) खराब वर्तनुकी प्रकरणी सदस्यांचे निलंबन करून योग्य कारवाई केली आहे. नॅथन लॉयन लंगडत लंगडत खेळण्यासाठी आला त्यावेळी प्रेक्षकांनी त्याला स्टँडिंग ओवेशन दिलं. हे खेळ भावनेचं उत्तम उदाहरण होतं, असं मत देखील पंतप्रधान कार्यालयाकडून मांडण्यात आलं आहे. त्यामुळे आता क्रिडाविश्वात अॅशेसबद्दल जोरदार चर्चा सुरू असल्याचं दिसतंय.


नेमकं काय झालं?


 इंग्लंडच्या दुसऱ्या डावाच्या 52 व्या ओव्हरमध्ये कॅमेरून ग्रीन ऑस्ट्रेलियासाठी गोलंदाजी करत होता. क्रीझवर जॉनी बेअरस्टो कॅप्टनची साथ देत होता. शेवटच्या चेंडूवर जॉनी स्वत:चा बचाव करताना दिसला. त्याने शेवटचा बॉल सोडून दिला. त्यावेळी मात्र, विकेटकीपर अलॅक्स कॅरीने (Alex Carey) थ्रो केला आणि बॉल स्टंपवर लागला. त्यावेळी जॉनी बेअरस्टो नॉन स्टाईकच्या दिशेने चालत जात असल्याचं दिसतंय. जॉनी आपल्या सहकारी खेळाडूशी बोलण्यासाठी क्रीझच्या पुढे जात असताना, विकेटच्या मागून अॅलेक्स कॅरीने (Jonny Bairstow controversial Run Out) त्याला धावबाद केले. त्यामुळे कांगारूंनी अंपायरकडे अपिल केली. अंपायरने थर्ड अंपायरकडे बोट दाखवलं. त्यानंतर थर्ड अंपायरने जॉनी बेअरस्टोला आऊट घोषित केलं. 


पाहा Video



दरम्यान, तुम्हाला कदाचित माहिती असेल की, अॅशेस मालिका ही दोन्ही देशासाठी काळजाचा विषय आहे. दोन्ही देशाचे राजनैतिक संबंध देखील या मालिकेवरून ठरतात. 1932 - 33 मध्ये अॅशेसवरून दोन्ही देशांचे संबंध ताणले गेले होते. त्यामुळे आता 90 वर्षानंतर पुन्हा तोच इतिहास रिपीट होणार की काय? असा सवाल आता विचारला जातोय.