Jonny Bairstow: कांगारूंकडून रडीचा डाव? बेअरस्टो Out की Not Out? Video पाहून तुम्हीच सांगा!

Jonny Bairstow controversial Run Out: सामन्यात इंग्लंडसाठी कर्णधार बेन स्टोक्सने (Ben Stokes) शानदार शतक झळकावलं, तर जॉनी बेअरस्टो ज्याप्रकारे (Jonny Bairstow) बाद झाला त्याचा व्हिडिओ चर्चेत आहे. 

Updated: Jul 2, 2023, 06:37 PM IST
Jonny Bairstow: कांगारूंकडून रडीचा डाव? बेअरस्टो Out की Not Out? Video पाहून तुम्हीच सांगा! title=
Jonny Bairstow Run out Alex Carey

England vs Australia, 2nd Test: सध्या क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्ड क्रिकेट ग्राऊंडवर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया (ENG vs AUS) यांच्या अॅशेस सिरीजमधील दुसरी टेस्ट खेळली जात आहे. दुसऱ्या सामन्याच्या शेवटच्या दिवशी एक धक्कादायक घटना पहायला मिळाली. त्यावरून आता चांगलाच वाद होताना दिसत आहे. अतितटीच्या या सामन्यात इंग्लंडसाठी कर्णधार बेन स्टोक्सने (Ben Stokes) शानदार शतक झळकावलं, तर जॉनी बेअरस्टो ज्याप्रकारे (Jonny Bairstow) बाद झाला त्याचा व्हिडिओ चर्चेत आहे. 

कॅमेरून ग्रीनच्या (Cameron Green) 52 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर जॉनी बेअरस्टो ज्या प्रकारे धावबाद झाला, त्यावरून वाद पेटल्याचं पहायला मिळतंय. इंग्लंडच्या दुसऱ्या डावाच्या 52 व्या ओव्हरमध्ये कॅमेरून ग्रीन ऑस्ट्रेलियासाठी गोलंदाजी करत होता. क्रीझवर जॉनी बेअरस्टो कॅप्टनची साथ देत होता. शेवटच्या चेंडूवर जॉनी स्वत:चा बचाव करताना दिसला. त्याने शेवटचा बॉल सोडून दिला. त्यावेळी मात्र, विकेटकीपर अलॅक्स कॅरीने (Alex Carey) थ्रो केला आणि बॉल स्टंपवर लागला. त्यावेळी जॉनी बेअरस्टो नॉन स्टाईकच्या दिशेने चालत जात असल्याचं दिसतंय.

आणखी वाचा - Nathan Lyon: काल कुबड्यांवर गेला, आज टीमसाठी मैदानात; प्रेक्षकांकडून टाळ्याचा कडकडाट; पाहा Video

जॉनी आपल्या सहकारी खेळाडूशी बोलण्यासाठी क्रीझच्या पुढे जात असताना, विकेटच्या मागून अॅलेक्स कॅरीने (Jonny Bairstow controversial Run Out) त्याला धावबाद केले. त्यामुळे कांगारूंनी अंपायरकडे अपिल केली. अंपायरने थर्ड अंपायरकडे बोट दाखवलं. त्यानंतर थर्ड अंपायरने जॉनी बेअरस्टोला आऊट घोषित केलं. अंपायरचा निर्णय ऐकून सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे. जॉनीला 22 चेंडूत केवळ 10 धावा करता आल्या.

पाहा Video

जॉनी बेअरस्टोला देण्यात आलेला निर्णय योग्य होता, असं क्रिडातज्ज्ञांचं म्हणणं आहे. पूर्ण इंग्लंड संघाच्या चेहऱ्यावर फक्त निराशाच दिसत होती. हा व्हिडिओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामुळे आता व्हिडिओ पाहून तुम्हीच सांगा जॉनी बेअरस्टो आऊट की नॉटआऊट...

दरम्यान, पहिल्या डावात कांगारूंनी मजबूत स्कोर उभा केला. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने 416 धावा केल्या. त्याला प्रत्युत्तर देताना इंग्लंडने 325 धावा केल्या. त्यामुळे 91 धावांची लीड ऑस्ट्रेलियाला मिळाली. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने 279 धावा करत 371 धावांचं आव्हान इंग्लंडसमोर ठेवलं आहे. त्यामुळे आता सामना कोण जिंकणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.