Ultratech Cement Buy India Cement: 2 वर्षांपुर्वी पंचाहत्तरी पूर्ण करणारी सिमेंट कंपनी आपली हिस्सेदारी विकायला चालली आहे. या कंपनीचे कनेक्शन टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनीशी आहे. आता या कंपनीची कमान सिमेंट बाजारातील दिग्गज कंपनी अल्ट्राटेककडे असेल. ही डील पूर्ण झाल्यास अदानींना मोठा स्पर्धक उभा राहू शकतो. अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचे मालक कुमार मंगलम विर्ला यांनी एन श्रीनिवास यांच्या इंडिया सिमेंटमध्ये मोठी हिस्सेदारी खरेदी करण्याची ऑफर दिली आहे. एन श्रीनिवासन हे क्रिकेट फ्रॅचाइजी चेन्नई सुपर किंग्जचे मालक आहेत. या टीमचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनी आहे.टीम इंडियाचा माजी खेळाडू राहुल द्रविडदेखील याच्याशी जोडला गेलाय. 


किती लागलीय बोली?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अल्ट्राटेक सिमेंटमध्ये 32.7 टक्के इतकी हिस्सेदारी खरेदी करण्यासाठी 3 हजार 954 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली आहे. ही किंमत कंपनीच्या प्रति शेअर 390 रुपयांच्या दरानुसार ठरवण्यात आली आहे. याआधी अल्ट्राटेकने गेल्या जूनमध्येच इंडिया सिमेंटचे मोठे गुंतवणूकदार राधाकृष्ण दमानी यांची 23 टक्के भागीदारी विकत घेतली होती. अशाप्रकारे अल्ट्राटेकने या कंपनीच एकूण 7 हजार 100 कोटी रुपयांची भागीदारी खरेदी केली. कंपनीसाठी लावण्यात आलेली ताजी बोली प्रमोटर्सची हिस्सेदारी खरेदी करण्यासाठी आहे. यामध्ये मोठा भाग हा एन श्रीनिवास यांच्या परिवाराकडे आहे. 


डीलचा काय होणार परिणाम?


ही डील पूर्ण झाल्यानंतर इंडिया सिमेंट ही एकप्रकारे अल्ट्राटेकची सब्सिडी प्लेयर म्हणून काम करेल. यानंतर श्रीनिवासन आणि त्यांच्या कुटुंबाला बोर्ड सोडावे लागेल. ही डील पूर्ण झाल्यानंतर अल्ट्राटेक दक्षिण भारतात आणखी विस्तार करणार आहे. सध्या अल्ट्राटेकला दक्षिण भारतात पाय रोवताना अडचणींचा सामना करावा लागतोय. पण डील पूर्ण झाल्यानंतर आंध्र प्रदेश, तामिळनाडू, राजस्थान आणि तेलंगणामध्ये कंपनी मजबुतीने उभी राहणार तसेच वाढू शकणार आहे. 


सिमेंट बाजारामध्ये वाढणार स्पर्धा 


अल्ट्राटेकच्या या पावलानंतर अदानी समुहानेदेखील पन्ना सिेमेंट खरेदी करण्याची डील पक्की केली आहे.यामुळे सिमेंट बाजारात बिर्ला समूह आणि अदानी समूह यांच्यातील स्पर्धा वाढणार आहे. क्षमतेनुसार पाहायला गेलं तर अल्ट्राटेक ही देशातील सर्वात जास्त सिमेंट उत्पादन करणारी कंपनी आहे. याची क्षमता वार्षिक 15.3 कोटी टन इतकी आहे.या कंपनीने 2027 पर्यंत 20 कोटी पर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य ठेवले आहे. दुसऱ्या नंबरवर अदानी समुहाची अंबुजा-एसीसी आहे. ज्याची क्षमता 8.9 कोटी इतकी आहे. श्रीसिमेंटदेखील 5 कोटी टन क्षमतेने तिसऱ्या स्थानावर आहे. डालमिया भारतची क्षमता 4.7 कोटी टन आहे. तर जेके सिमेंटची क्षमता 2.2 कोटी टन इतकी आहे.