मुंबई : आयपीएल 2022 पासून क्रिकेट वर्तुळात चर्चेत आलेल्या उमरान मलिकच्या गोलंदाजीची सर्वत्र चर्चा सुरु आहे.आयर्लंड विरुद्ध सामन्यातील त्याच्या कामगिरीची कौतून होत असताना, आता पून्हा एकदा त्याने असा एक कारनामा केला आहे, ज्याने तो पुन्हा एकदा कौतूकास पात्र ठरताना दिसत आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उमरान मलिकने आयर्लंड विरुद्धच्या दोन टी 20 सामन्याच्या मालिकेतून डेब्यु केला होता. दुसऱ्या टी 20 मॅच मध्ये त्याने शेवटच षटक टाकताना आपली छाप उमटवली होती. यानंतर सध्या तो भारतीय संघासोबत इंग्लंडमध्ये आहे. इंग्लंड विरुद्ध (IND vs ENG) होणाऱ्या टी 20 सीरीजसाठी त्याची भारतीय संघात निवड झाली आहे. 


डर्बीमध्ये दीपक हुड्डा, उमरान मलिकची चर्चा
भारताचे दोन संघ इंग्लंड मध्ये आहेत. सीनियर संघाचा एजबॅस्टन येथे इंग्लंड विरुद्ध कसोटी सामना सुरु आहे, काल ऋषभ पंतने इंग्लंड विरुद्ध शानदार शतक झळकावलं. भारताचा कसोटी सामना जिथे सुरु आहे, तिथून 57 किमी अंतरावर भारतीय संघाचा डर्बीशायर विरुद्ध पहिला टी 20 सराव सामना झाला. या मॅच मध्ये दीपक हुड्डा आणि उमरान मलिकने छाप उमटवली. या सराव सामन्यात उमरान मलिकने आपल्या वेगाची दहशत दाखवून दिली.



सेट फलंदाज क्लीन बोल्ड 
उमरान मलिकच्या गोलंदाजीत काय ताकत आहे, ते त्याने काल पुन्हा दाखवून दिलं. सेट झालेल्या ब्रुक गेस्टला त्याने क्लीन बोल्ड केलं. ब्रुकने 23 धावा केल्या. उमरान मलिकने 4 षटकात 31 धावा देत दोन विकेट घेतल्या. हे दोन्ही विकेट्स घेताना त्याने समोरच्या फलंदाजाची दांडी गुल केली. भारताने डर्बीशायर विरुद्धचा हा सामना 20 चेंडू आणि सात विकेटने जिंकला.