नवी दिल्ली :  टीम इंडियाचा जलद गती गोलंदाज उमेश यादव याचा आज वाढदिवस त्याला सोमवारीच आपल्या वाढदिवसाचं गिफ्ट मिळाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोमवारी झालेल्या टीम घोषणेत श्रीलंकेविरूद्धच्या टेस्ट सिरीजसाठी उमेश यादव याला संघात कायम ठेवण्यात आले आहे.  सध्या तो वन डे आणि टी-२० संघात नाही आहे. टीम इंडियात जलद गोलंदाज म्हणून ऑस्ट्रेलियाच्या भारत वन डे सिरीजमध्ये त्याची कामगिरी समाधानकारक नव्हती. एका मॅचमध्ये त्याने ४ विकेट घेतल्या पण खूप धावा दिल्या.


टीम इंडियापर्यंचा उमेशचा प्रवास अवघड


टीम इंडियाच्या टेस्ट टीममध्ये मुख्य गोलंदाजापर्यंतचा उमेश यादवचा प्रवास खूप सोपा नव्हता. त्याचे वडील उत्तर प्रदेशातील देवरिया येथील राहणारे आहेत. ते एका कोळशाच्या खाणीत काम करायचे. त्यामुळे तो नागपूरजवळ खापरखेडा येथील वेस्टर्न कोल लिमिटेडच्या कॉलनीत राहायचा , उमेश या परिस्थितीत मोठा झाला.. 


पोलीस भरतीचा प्रयत्न 


उमेशने यादवच्या करिअरची सुरूवात  होण्यापूर्वी त्याने पोलीसमध्ये भरतीसाठी प्रयत्न केले होते. तसेच तो सैन्यातही भरतीसाठी प्रयत्नशील होता. पण तो यशस्वी ठरला नाही.  त्यानंतर त्याने क्रिकेटला आपले करिअर बनवले. तो विदर्भाच्या संघात सामील झाला. 


उमेश देशातील अशा काही निवडक गोलंदाजामध्ये आहे की ज्यांची गती १४० पेक्षा अधिक आहे. त्याने २००८मध्ये विदर्भाकडून पदार्पण केले. त्याने ४ सामन्यात २० विकेट घेतल्या होत्या. २०१० मध्ये त्याला दिल्लीकडून आयपीएलच्या संघात घेतले. यात त्याने चांगली कामगिरी केली. त्यानंतर त्याला टीम इंडियात स्थान मिळाले. 


जुलै २०१६ ते जुलै २०१७ या कालावधीत त्याने सर्वाधिक षटकं टाकलीत. त्याने सर्व फॉरमॅटमध्ये ४९३.१ षटके फेकली. या सर्व ओव्हर त्याने आंतरराष्ट्रीय सामन्यात टाकली आहेत. हे भारतीय जलद गोलंदाजाने या कालवधीत टाकलेल्या सर्वाधिक ओव्हर्स आहेत.