मुंबई : पाच वनडे आणि एका टी-20 सीरिजसाठी भारतीय संघ वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यामध्ये क्रिकेटबरोबरच भारतीय संघ मौज मजा करतानाही दिसत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय खेळाडूंनी त्यांच्या कुटुंबासोबतचे अनेक फोटो सोशल नेटवर्किंगवरून शेअर केले आहेत. उमेश यादवनं मात्र आगळा वेगळा फोटो इस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. हातात खेकडे घेतलेला उमेश यादवचा हा फोटो सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहे.


पाच वनडे मॅचच्या या सीरिजमधली पहिली मॅच पावसामुळे रद्द झाली. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या वनडेमध्ये भारताचा विजय झाला. पण चौथी वनडे जिंकत वेस्ट इंडिजनं सीरिजमध्ये कमबॅक केलं.