WTC Final 2023, Umesh Yadav: येत्या 7 जूनपासून इंग्लंडच्या 'द ओव्हल' मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा (WTC 2023 Final) अंतिम सामन्याचा थरार रंगणार आहे. त्यासाठी आता दोन्ही संघ रणनिती आखत असल्याचं दिसतंय. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि पॅट कमिन्स (Pat Cummins) दोन्ही कॅप्टन्स आपापल्या संघासाठी योजना आखत आहे. अशातच आता टीम इंडियासाठी वाईट बातमी समोर आली आहे. त्यामुळे आता कॅप्टनचं टेन्शन वाढलंय.


टीम इंडियाला दुखापतीचं ग्रहण


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) जखमी असल्याने गेल्या काही महिन्यांपासून संघाबाहेर आहे. त्याला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलपूर्वी टीम इंडियामध्ये संधी मिळेल, अशी शक्यता होती. मात्र, बीसीसीआयने (BCCI) टीम जाहीर केली, त्यावेळी देखील बुमराह संघात नसल्याचं समोर आलंय. अशातच आता टीम इंडियाला आणखी एक धक्का बसला आहेत.


उमेश यादव जखमी


भारताचा स्टार गोलंदाज उमेश यादव (Umesh Yadav) जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सामन्यात उमेश यादवला दुखापत (Umesh Yadav injured) झाली होती. त्यानंतर उमेश यादवला गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात बाहेर बसावं लागलं होतं. त्यामुळे आता तो फायनलसाठी उपलब्ध असेल, अशी शक्यता खूप कमी आहे.  त्यामुळे आता उमेशच्या जागेवर कोणाला संधी मिळणार? असा सवाल विचारला जात आहे.


आणखी वाचा - WTC 2023 Final: Ajinkya Rahane ला संधी का मिळाली? Sunil Gavaskar यांनी कारण सांगत निवडली Playing XI


पंजाब किंग्स विरोधात गोलंदाजी करताना उमेश यादवने आयपीएलमध्ये (IPL 2023) इतिहास रचला आहे. आयपीएलमध्ये एका संघाविरुद्ध सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या यादीत उमेशने बाजी मारलीये. पंजाब किंग्जविरुद्ध उमेशने एकूण 34 विकेट घेतल्यात. त्यामुळे आता उमेश यादव भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन (World Test Champion) किताब जिंकवून देईल, असा विश्वास व्यक्त केला जात होता.


भारत आणि ऑस्ट्रेलिया (Australia vs India) यांचा अंतिम सामना 7 जून 2023 रोजी लंडन होणार आहे. लंडनमधील केनिंग्टन ओव्हल स्टेडियमवर हा सामना खेळवला जाईल. हा सामना जिंकून वर्ल्ड टेस्टचा चॅम्पियन होण्याचा बहुमान कोण मिळवणार? याची चर्चा होताना दिसते.


ICC WTC Final साठी ऑस्ट्रेलियाचा संघ


पॅट कमिन्स (C), स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, मिचेल मार्श, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क आणि डेव्हिड वॉर्नर.


ICC WTC Final साठी भारतीय संघ


रोहित शर्मा (C), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, केएस भरत (WC), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव यादव.