Ind vs Aus: आगामी T20 World Cup साठी आता सर्वच टीम सज्ज झाल्या आहेत. आशिया कपमध्ये (Asia Cup) झालेल्या पराभवानंतर भारतीय बॉलिंग लाईनअप कर्णधार रोहित शर्मासाठी (Rohit Sharma) डोकेदुखीचा विषय ठरलाय. 16 ऑक्टोबरपासून सुरू होण्याऱ्या वर्ल्ड कपआधी संघाची गोलंदाजी रुळावर आणण्याचं मोठं चॅलेंज रोहितसमोर होतं. अशातच आता टीम इंडियात एका घातक गोलंदाजीची एन्ट्री झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

येत्या 20 सप्टेंबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये (Ind vs Aus) 3 सामन्याची टी 20 मालिका होणार आहे. दोन्ही संघाचा पहिला सामना मोहालीमध्ये (Mohali) खेळला जाईल. मात्र, त्याआधीच स्टार गोलंदाज मोहम्मद शमीला (Mohammed Shami) टीम इंडियामधून बाहेर जावं लागलं. अशातच शमीच्या जागी इंग्लंडमध्ये उत्तम गोलंदाजी करण्याऱ्या उमेश यादवला (Umesh Yadav) टीम इंडियात संधी देण्यात आली आहे. (Umesh Yadav's entry in Team India as Mohammad Shami is corona positive)


3 वर्षानंतर टीम इंडियात कमबॅक - 


मोहम्मद शमी कोरोना पॉझिटिव्ह (Mohammed Shami covid positive) असल्याने उमेश यादवला संघात सामील करून घेतलं. उमेश यादवने तब्बल 3 वर्षानंतर लिमिटेड ओव्हर क्रिकेटमध्ये पुनरागमन केलंय. उमेशने मागील टी 20 सामना 2019 मध्ये खेळला होता. सध्याचा उमेशचा फॉर्म पाहता भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया सिरीज रोमांचक होण्याची शक्यता आहे. 


इंग्लंडमध्ये जबरदस्त प्रदर्शन-


इंग्लंडमध्ये सध्या क्रिकेटचा सिझन सुरू आहे. रॉयल लंडन वनडे कप (Royal London ODI Cup) या सारखे टुर्नामेंट खेळले जात आहे. मिडिलसेक्सकडून खेळताना उमेश यादवने टुर्नामेंटमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम केलाय. 5 सामन्यात फक्त 18 च्या स्टाईक रेटने धावा देत 15 विकेट नावावर केल्या. दरम्यान, एकाच सामन्यात 5 विकेट घेण्याचा पराक्रम देखील यावेळी करून दाखवला आहे.


ऑस्ट्रेलियाविरूद्ध भारतीय संघ- 


के एल राहुल, रोहित शर्मा (कर्णधार), सुर्यकुमार यादव, विराट कोहली, अक्षर पटेल, दिपक हुड्डा, हार्दिक पांड्या, रविचंद्रन आश्विन, दिनेश कार्तिक, रिषभ पंत, भुवनेश्वर कुमार, दिपक चहर, हर्षल पटेल, जस्प्रित बुमराह, उमेश यादव, यजुवेंद्र चहल.