Video | सचिनच्या द्विशतकासाठी अंपायरची मदत, आऊट असतानाही नॉट आऊट दिलं, `या` बॉलरचा दावा
सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) 24 फेब्रुवारी 2010 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिलं द्विशतक लगावलं होतं.
ग्वाल्हेर | मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत अनेक विक्रम केले आहेत. सचिनला क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन आता काही वर्ष लोटले आहेत. त्यानंतरही सचिनचे रेकॉर्ड अबाधित आहेत. सचिनने वनडे क्रिकेटच्या इतिहासात सर्वात आधी द्विशतक झळकावण्याची (Sachin Tendulkar Double Century) ऐतिहासिक कामागिरी केली होती. सचिनने हे द्विशतक 2010 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केलं होतं. हे द्विशतक करण्यासाठी अंपायर इयान गोल्डने (Ian Gould) सचिनला बाद असतानाही तसं घोषित केलं नाही, असा धक्कादायक दावा आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनने केला आहे. (Umpire Ian Gould cheated to get Sachin Tendulkar to complete double century, claims bowler Dale Steyn)
स्टेन काय म्हणाला?
डेल स्टेन इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स एंडरसनसोबत पॉडकास्टमध्ये बोलत होता. यावेळेस स्टेनने हा आरोप केला. "तेंडुलकरने ग्वाल्हेरमध्ये आमच्या विरुद्ध वनडे क्रिकेटमधील पहिलंवहिलं द्विशतकं लगावलं. मला आठवतंय की मी सचिनला 190 धावांवर खेळत असताना एलबीडबल्यू आऊट केलं होतं. मात्र फिल्ड अंपायर इयान गोल्डने सचिनला नॉट आऊट घोषित केलं", असं स्टेन म्हणाला.
अंपायर काय म्हणाला होता ?
सचिनला एलबीडबल्यू आऊट का दिलं नाही, असा जाब मी पंचांना विचारला. त्यांनी मला इशारा केला. "जरा आसपास बघ. मी सचिनला आऊट दिलं तर हॉटेलमध्ये परतू शकणार नाही" असंही डेल स्टेनने म्हटलं.
सचिननंतर कोणी द्विशतकं ठोकलंय?
सचिननंतर अनेकांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक लगावण्याचा कारमाना केलाय. यामध्ये टीम इंडियाचे खेळाडू आघाडीवर आहेत. सलामीवीर आणि आक्रमक अशी ओळख असलेले वीरेंद्र सेहवाग आणि रोहित शर्मा या दोघांनी द्विशतक लगावलंय. सेहवागने 2011 मध्ये 219 धावांची खेळी केली. तर रोहितने 2013 मध्ये 209 तर 2014 ला 264 धावांची खेळी केली. रोहित वनडेमध्ये 264 धावांसह सर्वोच्च धावसंख्या करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड केला. युनिव्हर्स बॉस (Universe Boss) ख्रिस गेलने 2015 च्या वर्ल्ड कपमध्ये 215 रन्स केल्या. तर यानंतर न्यूझीलंडच्या मार्टिन गुप्टीलने 237 धावा केल्या.
रोहितने पुन्हा एकदा प्रतिस्पर्धी संघाला घाम फोडत तिसरं द्विशतकं साजरं केलं. रोहितने 2017 मध्ये 208 धावा करत वनडेमधील तिसरं वैयक्तिक द्विशतकं पूर्ण केलं. यानंतर 2018 मध्ये अखेरचं द्विशतक हे पाकिस्तानच्या फखर जमाने 210 धावा चोपल्या होत्या.