T20 world cup 2022 : टी-20 वर्ल्डमध्ये आता भारत विरुद्ध झिब्माब्वे असा सामना सुरु आहे. आज सकाळी झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव झाल्याने टीम इंडिया आणि पाकिस्तान यांना सेमीफायनलचं तिकीट मिळालं आहे. मात्र अव्वल स्थान कामय राहण्यासाठी हा सामना महत्त्वाचा आहे. आजच्या सामन्यात असलेल्या अंपायरच नाव जर तुम्हाला समजलं तर तुमच्याही कपाळ्याला आट्या पडतील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजच्या सामन्याचे अंपायर आहेत रिचर्ड केटलब्रॉ. हे तेच अंपायर आहेत जे टीम इंडियासाठी यापूर्वी मोठे पनौती ठरलेले आहेत. 


रिचर्ड केटलब्रो 2014 पासून जवळपास सर्व ICC स्पर्धांमध्ये नॉकआउट फेरीत टीम इंडियासाठी 'पनौती' ठरलेत. रिचर्ड केटलब्रॉ यांनी गेल्या काही वर्षांमध्ये भारताने खेळलेल्या जवळपास सर्वच ICC नॉकआउट मॅचेसमध्ये अंपायरिंग केलंय. इतकंच नाही तर या सामन्यांमध्ये भारताचा पराभवही झालाय. 


अंपायर रिचर्ड केटलब्रॉ हे नेहमीच टीम इंडियासाठी अनलकी ठरलेत. खासकरून आयसीसी स्पर्धांच्या नॉकआऊट सामन्यांत हे जास्त घडताना दिसलंय. रिचर्ड केटलब्रो यांनी गेल्या काही वर्षांमध्ये भारताने खेळलेल्या जवळपास सर्व ICC नॉकआऊट सामन्यांमध्ये अंपायर म्हणून काम केलंय. भारताने ते सर्व सामने गमावलेत. भारताने सर्व ICC स्पर्धा गमावल्या आहेत ज्यात रिचर्ड केटलब्रो हे 2014 पासून भारताच्या मॅचेससाठी अंपायर म्हणून कार्यरत होते.


2014 च्या T20 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात भारत विरूद्ध श्रीलंका, 2015 च्या आयसीसी वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया, 2016 च्या T20 वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध, 2019 च्या वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंडविरुद्ध आणि 2021 च्या ग्रुपस्टेजमध्ये न्यूझीलंडविरूद्ध या सर्वा सामन्यांमध्ये केटलब्रॉ असताना टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता. 


टीम इंडियाची प्रथम फलंदाजी


ऑस्ट्रेलियामध्ये सुरु असलेल्या टी 20 वर्ल्डकपमध्ये (T20 world cup 2022) आज टीम इंडियाचा (Team India) सामना झिम्बाव्बेशी (Zimbabwe) सुरु आहे. या सामन्यात टीम इंडियाने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहितच्या सेनेने पहिली फलंदाजी करत झिम्बाव्बेच्या टीमला 187 रन्सचं लक्ष्य दिलं आहे. सध्या ग्रुप 2 च्या पॉईंट्सटेबलमध्ये (Points table) टीम इंडिया अव्वल स्थानावर आहे.