Umran Malik: बॉल आहे की बंदुकीची गोळी! उमरान मलिक झाला वेगाचा बादशाह; सर्व रेकॉर्ड मोडले
IND vs SL 1st ODI Match: उमरानने (Umran Malik 156) माझा विक्रम मोडला तर मला आनंद होईल. पण माझा विक्रम मोडता मोडता त्याने हाडे मोडून घेऊ नयेत हीच माझी प्रार्थना आहे, असं म्हणत शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) उमरानला डिवचलं होतं. त्यानंतर आता...
Umran Malik Fastest Delivery: भारताला (Team India) सुरूवातीपासून फास्ट बॉलर (fast bowler) कमतरता भासते. भारतात उत्कृष्ट फलंदाज, चांगले फिरकीपटू मिळतात. मात्र, फास्टरच्या बाबतीत भारताला नेहमी उणिव भासते. मात्र, आता टीम इंडियाचं टेन्शन संपलं आहे. कारण भारताला आता फास्टरचा बाहशाह मिळाला आहे, जो कित्येक फलंदाजांच्या दांड्या गुल करू शकतो. होय, टीम इंडियाला उमरान मलिक (Umran Malik) रुपात भेदकत गोलंदाज मिळाला आहे. (umran malik breaks his own record of fastest delivery for team india during ind vs sl 1st odi match marathi news)
भारत आणि श्रीलंका (IND vs SL 1st ODI Match) यांच्यात खेळल्या जात असलेल्या पहिल्या वनडे सामन्यात युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिकने स्वतःचाच विक्रम (Umran Malik New Record) मोडीस काढला आहे. या सामन्यात उमरानने ताशी 156 किमी वेगानं चेंडू फेकून भारतासाठी सर्वात वेगवान चेंडू (Fastest Delivery For India) फेकण्याचा स्वतःचा विक्रम मोडला आहे. यापूर्वी उमरान मलिकने ताशी 155 किमी वेगाने गोलंदाजी केली होती. त्यानंतर आता उमरान मलिक वेगाचा बादशाह झालाय.
श्रीलंकेविरुद्धच्या टी-ट्वेंटी मालिकेतील पहिल्या सामन्यात उमरान मलिकने 155 किलोमीटर प्रतितास वेगाने बॉल फेकून विक्रम केला होता. त्याआधी जवगल श्रीनाथच्या (Javagal Srinath) नावावर 154.5 वेगाचा रेकॉर्ड होता. त्यानंतर आजच्या सामन्यात उमरान मलिकने 156 च्या स्पीडने बॉल फेकून नवा विक्रम रचला आहे. त्यामुळे सध्या फक्त आणि फक्त उमरानचं कौतूक होताना दिसतंय.
दरम्यान, उमरानने (Umran Malik) माझा विक्रम मोडला तर मला आनंद होईल. पण माझा विक्रम मोडता मोडता त्याने हाडे मोडून घेऊ नयेत हीच माझी प्रार्थना आहे, असं म्हणत शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) उमरानला डिवचलं होतं. त्यानंतर आता आजचा फास्टर बॉल फेकून उमरानने रावळपिंडी एक्सप्रेसची हवा टाईट केली आहे. रोहित सेनेने पहिल्याच सामन्यात लंकादहन केलं, पण श्रीलंकेच्या शेपटाने झुंजवलं आणि टीम इंडियाच्या गोलंदाजांचा घाम फोडला.