मुंबई : आयपीएलमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्यांना टीम इंडियामध्ये खेळण्याची संधी मिळू शकते. याची बरीच उदाहरणं समोर आहेत. आता आयपीएलमध्ये उत्तम बॉलिंग करणाऱ्या खेळाडूसाठी टीम इंडियाचे दरवाजे खुले होऊ शकतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाचे कोच रवी शास्त्री यांनी भाकीत वर्तवलं आहे. लवकरच घातक बॉलर टीम इंडियामध्ये खेळू शकतो. सध्या टीम इंडियामध्ये बुमराह सर्वात घातक बॉलर म्हणून ओळखला जातो. तेवढ्याच तोडीचा दुसरा बॉलर आता टीम इंडियाला मिळणार आहे.


जर या बॉलरला आंतरराष्ट्रीय सामन्यात संधी दिली तर तो विरोधी टीमला तंबुत धाडेल असा विश्वास शास्त्रींनी व्यक्त केला. रवी शास्त्री ज्या बॉलरलं एवढं तोंडभरून कौतुक करत आहेत आणि ज्याच्याबद्दल भाकीत केलं तो नेमका बॉलर कोण जाणून घेऊया. 


हैदाराबदकडून उमरान मलिक खेळत आहे. त्याचं कौतुक रवी शास्त्रांनी केलं आहे. उमरान मलिक जम्मू काश्मीरचा आहे. त्याने आयपीएलमध्ये 150 किमी प्रती वेगानं गोलंदाजी केली. त्याची आयपीएलमधील कामगिरी पाहता तो आंतरराष्ट्रीय स्तरावही उत्तम कामगिरी करेल असा विश्वास रवी शास्त्रांनी व्यक्त केला. 


उमरानला मेगा ऑक्शनमध्ये हैदराबाद संघाने 4 कोटी रुपये देऊन संघात घेतलं होतं. हैदराबाद 61 धावांनी जरी पराभूत झालं असलं तरी उमरानची चर्चा मात्र खूप आहे. या टीमचा पुढचा सामना 4 एप्रिल रोजी होणार आहे. या सामन्यावरही लक्ष असणार आहे. 


उमरानची कामगिरी चांगली राहिली तर खरंच टीम इंडियाचे दरवाजे खुले होणार का? रवी शास्त्री यांचं भाकीत खरं होणार का? याची चाहत्यांना वाट पाहावी लागणार आहे.