ख्राईस्टचर्च : अंडर १९ वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये भारताने पाकिस्तानवर २०३ धावांनी विजय मिळवला. या विजयाचा हिरो ठरला शुभमन गिल. 


संपूर्ण वर्ल्डकपमध्ये शानदार फॉर्म


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संपूर्ण वर्ल्डकपमध्ये शानदार फॉर्ममध्ये असलेल्या गिलने १०२ धावांची नाबाद खेळी साकारली. यात ७ चौकार होते. संपूर्ण वर्ल्डकप सीरिजमध्ये शुभमनने ५०हून कमी धावा केल्या नाहीत.यासोबतच अनेक रेकॉर्ड त्याने आपल्या नावे केले. 


इतिहासात नवा रेकॉर्ड


तसेच अंडर १९ वर्ल्डकपच्या इतिहासात शुभमनने असा रेकॉर्ड केलाय जो आतापर्यंत कोणीच केलेला नाही. शुभमन गिल अंडर १९ वर्ल्डकपच्या इतिहास एकमेव फलंदाज आहे ज्याने सलग सहा सामन्यांमध्ये ५०हून अधिक धावा केल्यात. याआधी हा रेकॉर्ड मेहदी हसन मिराजच्या नावावर होता. 


अंडर १९ वर्ल्डकपमध्ये भारताकडून वेगाने शतक झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत शुभमन तिसऱ्या स्थानावर आहे. हा रेकॉर्ड आतापर्यंत भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या नावावर आहे.