टीम इंडियाच्या अंडर १९ संघाने बनवले हे रेकॉर्ड
अंडर १९ वर्ल्ड कपच्या इतिहासात सर्वात जास्त बॉल्स राखून जिंकण्यात टीम इंडिया दुसऱ्या स्थानावर आहे.
नवी दिल्ली : राहुल द्रविडच्या कोचिंगमध्ये खेळणारी टीम इंडियाची अंडर १९ टीम जबरदस्त फॉर्मात आहे.
वर्ल्ड कपच्या पहिल्या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाची दाणादाण उडवून दिल्यानंतर पापुआ न्यूगिनी संघावरही सहज विजय मिळविला. यासोबतच काही रेकॉर्डही झाले आहेत.
पहिल्यांदा असा विजय
अंडर १९ वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया पहिल्यांदाच १० विकेट्सनी जिंकली आहे.
इंडिया दुसऱ्या स्थानी
अंडर १९ वर्ल्ड कपच्या इतिहासात सर्वात जास्त बॉल्स राखून जिंकण्यात टीम इंडिया दुसऱ्या स्थानावर आहे.
ऑस्ट्रेलिया या ठिकाणी पहिल्या स्थानावर आहे.
टीम इंडियाने २५२ चेंडू राखून विजय मिळविला होता.
बॉल्स संघ
२७७ ऑस्ट्रेलिया विरुद्ध स्कॉटलंड २००४
२५२ भारत विरुद्ध. पापुआ न्यू गिनी २०१८
२५० दक्षिण आफ्रिका विरुद्ध. कॅनडा २००२
२४७ पाकिस्तान विरुद्ध आयर्लंड २०१८
रेकॉर्ड
टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाज अनुकूल रॉयने अंडर १९ मध्ये दुसऱ्यांदा सर्वोत्तम गोलंदाजी केली. आतापर्यंत भारताचा सर्वोत्कृष्ट गोलंदाजीचा रेकॉर्ड कमल पासीच्या नावे आहे.
त्याने २०१२ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध २३ सामन्यात ६ बळी घेतले होते.
अनूकूलने पापुआ न्यू गिनी विरुद्ध १४ रन्स दे ५ विकेट घेतल्या.