नवी दिल्ली : भारतीय महिला धावपटूने जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत ४०० मीटर प्रकारात  इतिहास नोंदवलाय. २० वर्षांखालील या स्पर्धेत हिमा दासने सुवर्णपदाकाची कमाई केली आहे. १८ वर्षीय हिमा ५१.४६ सेकंदात ४०० मीटर अंतर कापत सुवर्णपदक मिळवले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जागतिक स्पर्धेत ४०० मीटर प्रकारात सुवर्णपदक पटकावणारी हिमा पहिली भारतीय धावपटू ठरली आहे. हिमाने बुधवारी झालेल्या उपांत्य फेरीत ५२.१० सेकंदात ४०० मीटर अंतर कापून पहिले स्थान राखले होते. पहिल्या फेरीतही तिने ५२.२५ सेकंदात अंतर पार करत अव्वल स्थान पटकावले.


हिमा ही आसामची आहे. एप्रिलमध्ये गोल्डकोस्ट कॉमनवेल्थमध्ये सहाव्या स्थानी राहिली होती. त्यावेळी तिने ५१.३२ सेकंदात तिने ४०० मीटरचे अंतर पार केले होते. त्यानंतर सातत्याने कामगिरी उंचावत तिने अलीकडेच आंतरराज्यीय चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक मिळवले होते.